सोनंद (प्रतिनिधी): एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धीवंत प्रज्ञाशोध परीक्षेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंद च्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवून गुणवत्तेच्या बाबतीत आसपासच्या परिसरात दबदबा निर्माण केला आहे.

इ. 1ली ची वीरा वल्लभ कोकाटे हिने सोलापूर जिल्ह्यात पाचवा व तालुक्यात प्रथम ,स्वरा धनंजय डंबाळ हिने सोनंद केंद्रात प्रथम क्रमांक पटकवीला आहे.
इ.2 री चे आयुष नवनाथ शिंदे व संस्कृती विजयकुमार भिंगे या दोघानीही सोनंद केंद्रात प्रथम मिळविला, ओम अंतोष सोळगे, सत्यजित जयजीत पोळ यांनी केंद्रात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
इ. 3री तील संस्कृती तात्यासाहेब खांडेकर हिने केंद्रात प्रथम, सानवी चंद्रकांत कोडग हिने केंद्रात द्वितीय, प्रणव गणेश खांडेकर याने केंद्रात तृतीय मिळविला आहे.

इ. 4 थी मधून आरोही अमोल गायकवाड हिने केंद्रात 5 वा, श्रेया प्रशांत माने हिने केंद्रात 7 वा क्रमांक पटकवीला आहे.
इ. 5 वी चा स्वानंद कानिफनाथ काशीद याने केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
इ. 6 वी च्या वैष्णवी मनोहर गायकवाड हिने केंद्रात प्रथम व आराध्या अमोल गायकवाड हिने केंद्रात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मा. बाबासाहेब भोसले, सचिव मा. आनंदराव भोसले, सदस्या सौ. अनिता भोसले, सौ. रजनी भोसले,प्राचार्य हेमंत आदलिंगे, मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महाकाळ, प्रा. सुभाष आसबे,सौ. सुषमा ढेबे तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, सेवक, कर्मचारी या सर्वानी वरील सर्व गुणी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


