लक्ष्मीदेवी सोनंदचे इ. 10 वी परीक्षेत उत्तुंग यश

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी): फेब्रुवारी/मार्च2025 मध्ये पुणे विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इ. 10 वी बोर्ड परीक्षेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंदने इ. 12 वी परीक्षेप्रमाणेच इ.10 वी परीक्षेत उत्तुंग यश मिळवत शिक्षण क्षेत्रात वेगळाच दबदबा निर्माण केला आहे.

इ.10 वी परीक्षेचा शाळेचा निकाल 100% लागला असून, दिक्षा दादासो हिप्परकर हिने 90.20% गुण मिळवून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवीला आहे.
दुसऱ्या क्रमांकावर विभागून दोघांनी समान गुण मिळविले आहेत. विवेक नारायण भोसले व तेजस्वीनी आनंद कोडग या दोघांनीही 89.40% गुण मिळविले आहेत.
प्रिया अनिल माने हीस 86.80% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवीला आहे.
सलग सात वर्षे इ. 10 वी निकाल 100% लावून शाळेने एक विक्रम केला आहे.

या यशाबद्दल संस्था अध्यक्ष मा.बाबासाहेब भोसले,सचिव मा.आनंदराव भोसले संस्था सदस्या सौ. अनिता भोसले, सौ. रजनी भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राचार्य हेमंत आदलिंगे, मुख्याद्यापिका सौ. पुष्पा महाकाळ, प्रा. सुभाष आसबे, प्रा. विनायक कोडग, श्री. अमोल केंगार, श्री.सत्यवान शेजाळ, कर्मचारी रवि गोसावी या सर्वानी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार केला.
शाळेचा निकाल चांगला लागल्याने सर्व पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here