प्रतिनिधी (शशिकांत कोळी): सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाकडून घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत आयान अमजद मुजावर व प्रतिक दिगंबर हिप्परकर यांनी चमकदार कामगिरी करुन लक्ष्मीदेवी शिक्षण संकुलाचे नाव उंचावले आहे. ग्रामीण भागात राहूनही जिल्हा स्तरावरील स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल परिसरातील पालकांमधून शाळेबद्दल एक चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यात सोलापूर येथे होणार्या प्रज्ञा परीक्षेसाठी या दोघांचीही निवड झाली आहे. याबद्दल दोघांचाही शाळेमध्ये सत्कार करण्यात आला.
सदर शिक्षण संकुलात क्रीडा, सांस्कृतीक तसेच शैक्षणिक प्रगती याबरोबरच चांगले संस्कारही दिले जातात. नुकताच इ. १२ वी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी एम.एच. टी. सी.ई.टी.च्या कोर्सचे आयोजन केले असून यामुळे विद्यार्थ्यांचा परगावी जाण्याचा, राहण्याचा बराचसा खर्च बचत झाला असून पुणे,मुंबई,लातूर,कोल्हापूर येथे जाऊन शिकण्याऐवजी सोनंदमध्ये तेच शिक्षण मिळू लागले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक