प्रतिनिधी (शशिकांत कोळी): लक्ष्मीदेवी प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर, सोनंद प्रशालेचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५च्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मंगळवार दि २४डिसेंबर रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिराज शिक्षण प्रसारक मंडळ खारघर, नवी मुंबईचे अध्यक्ष मा. इंजि. बाबासाहेब भोसले, कृष्णा एज्युकेशन सोसायटी इस्लामपूरचे संस्थापक मा.विनायकराव पाटील होते. प्रमुख उपस्थिती संस्था सचिव मा. आनंदराव भोसले ,संस्था सदस्या सौ. अनिता भोसले, सौ रजनी भोसले ,प्राचार्य हेमंत आदलिंगे ,मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महांकाळ, पर्यवेक्षक सुभाष आसबे, पर्यवेक्षिका सौ. सुषमा ढेबे, चि. आदिराज भोसले सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वच पालकांनी दरवर्षी या प्रशालेचा कार्यक्रम खूप शिस्त व नियोजनबद्ध असतो, असे आवर्जून उल्लेखीत केले. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्याला कोणत्या ना कोणत्या कलेत सहभागी करून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.प्रत्येकाच्या अंगी असलेल्या गुणांचा उस्फूर्त आविष्कार विद्यार्थी आपल्या विविध कलांमधून दाखवितात. अभ्यासाबरोबरच, क्रीडा , चित्रकला ,सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय ,जिल्हास्तरीय यश प्राप्त केले आहे. बरेचसे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जाऊन आलेले आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात इ. पाचवीच्या वर्गाची लेझीम,झांज पथकाने एकाच सुरात गणेश वंदनाने झाली. कार्यक्रमांमध्ये खंडोबा गीत, शेतकरी गीत ,आई अंबाबाईचा गोंधळ, शिवाजी महाराज थिम, स्टेट सॉंग , देशभक्तीपर गीत ,साऊथ इंडीयन ,राजस्थानी, महाराष्ट्रीयन लावणी ,दिंडी सोहळा, मराठी ट्रेडिंग ,मॅशप गाणी ,रामायण याचबरोबर कॉमेडी नाटक, डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारीत समाजप्रबोधन पर नाटक अशा,एक नाही तर अनेक वेगवेगळ्या आणि आकर्षक अशा रंगीत व संगीतमय कार्यक्रमाने अगदी रसिक प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली होती.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले सुप्रसिद्ध लावणी सम्राट प्रीतम पाटील यांची लावणी. काही विद्यार्थी अभ्यासात हुशार नसतात, परंतु इतर कला त्यांच्यात असतात. त्यात सुद्धा तो कौशल्य प्राप्त करू शकतो.हेच विद्यार्थ्यांसमोर मांडण्यासाठी खास आवर्जून संस्थेने लावणी कलाकार प्रीतम पाटील यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.
या कार्यक्रमातील सर्व गाण्यांची कोरिओग्राफी, सौ. विनिता सूर्यवंशी डॉ.समृद्धी भोसले , इंजि.सृष्टी भोसले, सर्व वर्गांचे वर्गशिक्षक, कोरिओग्राफर सुरज मणेर (जत ) कॉलेज प्राध्यापक या सर्वांनीच भरपूर मेहनत घेतली.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या प्रशालेचे नांव आसपासच्या परिसरात नेहमीच अग्रेसर असते. जवळपास २५०० नागरीक व विद्यार्थी,पालक आपल्या पाल्यांची कला पाहण्यासाठी उपस्थित होते. मोठ्या शहरातील कॉन्व्हेंट स्कूल पेक्षाही अतिशय दर्जेदार कार्यक्रम येथील विद्यार्थी करतात. शैक्षणिक बाबीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचे प्रत्येक गाण्यात साजेसा पेहराव, गाण्यात वापरलेल्या प्रॉपर्टीज वरून . स्टेज सजावट साऊंड सिस्टिम यामुळे कार्यक्रम अगदी नियोजनबद्ध पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य हेमंत आदलिंगे , प्रमुख पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महांकाळ, कार्यक्रमासाठी श्री. औदुंबर केदार, जालिंदर कोळसे-पाटील उद्योगपती अमोल चव्हाण, हणमंतगांवच्या सरपंच सौ.दिपाली खांडेकर, दिनेश सोळगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अनिल गेजगे सर, पर्यवेक्षिका सौ.सुषमा ढेबे, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक