प्रतिनिधी (शशिकांत कोळी): फ़ेब्रुवारी२०२५ मध्ये झालेल्या पुणे विभागीय एच. एस. सी. म्हणजेच बारावी परीक्षेत सोनंद येथील लक्ष्मीदेवी शिक्षण संकुलातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी सलग सातव्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम ठेवत ,तालुक्यातील नामवंत शाळेबरोबर स्पर्धेत राहून गुणवत्तेत ग्रामीण भाग कधीच मागे नसतो हे दाखवून दिले आहे.
बारावी शास्त्र शाखेत एकूण 104 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 100% निकाल लागला. सोनाली सिद्धेश्वर काशीद हिने 80.33% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला असून, माहिती तंत्रज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत बोर्डात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. लक्ष्मीदेवीच्या शिरपेचात् पहिल्यांदाच हा मुकुट मिळाला असल्याने अनेक पालकांनी प्राचार्य, संस्था पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
प्रणिशा दादासो बाबर हिने 80.17% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावीला आहे. गौरव अरुण बाबर याने 78.33% गुण मिळवत तृतीय स्थान पटकवले आहे.
त्याच बरोबर 20 विद्यार्थ्यांनी 70% पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. ग्रामीण भागात कोणत्याही क्लास ची, ट्युशनची सोय उपलब्ध नसताना विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे.
वरील अप्रतिम यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. बाबासाहेब भोसले, सचिव मा. आनंदराव भोसले, संस्था सदस्या सौ. अनिता भोसले, सौ. रजनी भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
प्राचार्य हेमंत आदलिंगे, पर्यवेक्षक सुभाष आसबे, प्रा. आबासाहेब कोळी, प्रा.विनायक कोडग, प्रा. अभिजीत पवार, प्रा. सत्यवान शेजाळ, श्री. अमोल केंगार,श्री. मनोहर गायकवाड प्रा. सौ. वर्षा कोडग या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांची घरभेट करून सत्कार केला.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक