प्रतिनिधी (शशिकांत कोळी):- सोनंद येथील लक्ष्मीदेवी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्था सचिव आनंदराव भोसले यांचे शुभहस्ते संपन्न झाला. इयत्ता दुसरीतील ओम अंतोष सोळगे याने घेरडी केंद्रात प्रथम व राज्यात 13 वा,तर दुसरीचीच संस्कृती विजयकुमार भिंगे हिने राज्यात 20 वा क्रमांक पटकावला आहे.इयत्ता तिसरीची संस्कृती तात्यासाहेब खांडेकर हिने केंद्रात चौथा, इयत्ता चौथीमधून स्वरा वल्लभ कोकाटे व आरोही अमोल गायकवाड या दोघींनीही केंद्रात भरीव कामगिरी केली आहे.
इंटरनॅशनल आर्ट कॉम्पीटिशन स्पर्धेत प्रशालेतील 17 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून विविध प्रकारची बक्षीसे प्राप्त केली आहेत.
यामध्ये चार विद्यार्थ्यांनी मेडल व भेटवस्तू मिळविल्या आहेत.नऊ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल,उर्वरीत चार विद्यार्थ्यांनी प्रशस्तीपत्र पटकावले आहेत.
वरील दोन्हीही स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्था सचिव आनंदराव भोसले, संस्था सदस्या सौ. रजनी भोसले,मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महाकाळ, प्राचार्य हेमंत आदलिंगे, पर्यवेक्षक सुभाष आसबे,सर्व शिक्षक, शिक्षिका स्टाफ यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
संस्था सचिव आनंदराव भोसले यांनी यावेळी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करून, विद्यार्थ्यांनी यापुढे राज्य,देशपातळीवरील स्पर्धेसाठीही तयारी करून स्वतःचा व शाळेचा नावलौकिक वाढवावा. विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्था नेहमी पाठीशी राहील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संगीता बोराडे, सूत्रसंचालन श्रीमती जयप्रभा शिंदे तर आभार प्रदर्शन प्रा. आबासाहेब कोळी यांनी मानले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक