सोनंद(प्रतिनिधी): सांगोला क्रीडा संकुल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिर सोनंद प्रशालेतील विद्यार्थ्यांनी किक बॉक्सिंग,तायक्वांदो,बुद्धिबळ आणि कुस्ती स्पर्धेत यश मिळवून सांगोला तालुक्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे
14 वर्षे वयोगट व 41 किलो वजनी गटात ऋषिकेश हणमंत मोरे या विद्यार्थ्याने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक तसेच त्याची जिल्हास्तरीयसाठी निवड झालेली आहे.

इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनी स्नेहल बाळासो काशीद आणि गौरी विलास कोळसे या दोन विद्यार्थिनींचा किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक आणि विभागासाठी निवड झालेली आहे
तायक्वांदो स्पर्धेत स्नेहल बाळासो काशीद 17 वयोगटामधून प्रथम गौरी विलास कोळसे 19 वयोगटातून प्रथम, वैभवी विकास कोळशे 19 वयोगटातून प्रथम, इयत्ता नववीतील गणेश संजय चव्हाण द्वितीय क्रमांक, श्रावणी दादासो बाबर इयत्ता दहावी तृतीय क्रमांक, यशश्री दादासो काशीद इयत्ता बारावी, द्वितीय क्रमांक,पायल शंकर माने इयत्ता बारावी ,द्वितीय क्रमांक अशी एकंदरीत तायक्वांदो स्पर्धेमध्ये तीन गोल्ड मेडल, तीन सिल्वर मेडल, एक ब्रांझ मेडल विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले आहेत.

बुद्धिबळ स्पर्धेत 19 वर्ष वयोगटातून समृद्धी परशुराम कोडग प्रथम क्रमांक प्रणाली राजेंद्र बुरंगे 19 वर्षे वयोगट चतुर्थ क्रमांक, प्रथमेश सिताराम मोरे19 वर्ष वयोगट प्रथम क्रमांक या तिन्ही विद्यार्थ्यांची बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड झालेली आहे
या सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष मा श्री इंजि बाबासाहेब भोसले साहेब,संस्था सचिव मा श्री इंजि आनंदराव भोसले साहेब,संस्था सदस्या सौ अनिता भोसले मॅडम व सौ रजनी भोसले मॅडम,प्राचार्य मा हेमंत आदलिंगे सर,मुख्याध्यापिका सौ पुष्पा महांकाळ मॅडम पर्यवेक्षक सुभाष आसबे सर पर्यवेक्षिका सौ सुषमा ढेबे मॅडम,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हास्तरीय आणि विभाग खेळण्यासाठी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.संस्था पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी,त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक मा श्री नितीन जानकर सर,सर्व शिक्षक स्टाफ चे कौतुक केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


