लक्ष्मीदेवी विद्यामंदिर शैक्षणिक वर्षाची यशस्वी सांगता

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी):  बुधवार 23 एप्रिल 2025 रोजी शैक्षणिक वर्ष 2024 -25 चा अखेरचा दिवस .द्वितीय सत्र संपन्न होऊन उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार याचे औचित्य साधून तसेच शेवटचा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा आयोजकांकडून दिली गेलेली आकर्षक भेटवस्तू,गोल्ड मेडल,प्रशस्तीपत्रक विशेष म्हणजे लक्ष्मीदेवी विद्यामंदिर सोनंद प्रशालेला रंगभरण स्पर्धेमध्ये छोट्या विद्यार्थ्यांनी अफलातून रंगभरण स्पर्धेत यश मिळवल्याबद्द्ल् शाळेला ग्लोबल स्कूल अवॉर्ड यांचे वितरण करण्यात आले.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या वेळी घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनातील लहान गट तसेच मोठा गट मधील उत्कृष्ट प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देण्यात आले .विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.

तसेच प्राथमिक विभागात मोलाचे सहकार्य देऊन राज्यस्तरीय मंथन परीक्षेत घेरडी केंद्रात सर्वप्रथम ,जिल्ह्यात तसेच राज्यात क्रमांक पटकावून शाळेच्या नावलौकिकात भर टाकल्याने प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

आज प्रशालेमध्ये ब्रेन बूस्टर अकॅडमी सांगली यांच्यातर्फे 12 जून 2025 पासून सुरू करण्यात येणाऱ्या अबॅकस कोर्स बाबतची पालक मीटिंग संपन्न झाली.पालकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला .सर्व पालकांमधून संस्था पदाधिकाऱ्यांनी जो अबॅकस कोर्सचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल सर्वांनी कौतुक केले.दररोजच्या बिझी शेड्युल मधून मुलांना सांगोला ला घेऊन जाऊन अबॅकस कोर्स लावणे शक्य नव्हते .स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी ,व्यवहार ज्ञान,गणिती आकडेमोड,बौद्धिक क्षमतेचा विकास, स्पर्धा परीक्षेसाठी अबॅकस कोर्स किती महत्त्वाचा आहे ,हे पालकांना ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमी सांगलीच्या उपाध्यक्षा अफ्रीन रंगरेज तसेच सचिव श्वेता शिकलगर मॅडमनी पालकांना खूप छान मार्गदर्शन केले .बऱ्याच पालकांनी आपल्या पाल्याचे अबॅकस कोर्स साठी आजच ऍडमिशन फिक्स केले.दरवर्षी प्रशाला काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करत असते ,प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक बारकाईने शिक्षकांचे लक्ष असते,अभ्यासाबरोबर एक आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी वारंवार संस्कार सुद्धा दिले जातात ,पालक म्हणून खूप समाधानी असल्याचे बऱ्याच पालकांनी सांगितले. अकॅडमीच्या दोन्ही मॅडमनी विद्यार्थ्यांना जेव्हा डेमो दिला, तेव्हा मुलांनी अबॅकसचा कसलाही गंध नसताना गणिती तोंडी उत्तरे दिल्यामुळे त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.मुले सहजच अबॅकस ट्रिक्स आत्मसात करतील असा आत्मविश्वास दर्शविला.

याप्रसंगी संस्था सदस्या सौ रजनी भोसले ,मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महांकाळ ,पर्यवेक्षक श्री सुभाष आसबे, सौ. सुषमा ढेबे सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते

आज शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रत्येक वर्गा वर्गातून खाऊवाटप तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आईस्क्रीम ,कोल्ड्रिंक चे सुद्धा नियोजन केले गेले होते.

चालू वर्षाला हसत हसत निरोप तसेच येत्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी जोमाने स्वागतास उत्सुक असलेले सर्वच विद्यार्थी आज रंगीबेरंगी ड्रेस मध्ये खुलून दिसत होते.

कडक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे घरातून बाहेर पडू नका,मार्केटमधील स्टिंग सारखे कोल्ड्रिंक पिऊ नका,पोहताना किंवा अनेक नवीन गोष्टी शिकताना समोर वडीलधाऱ्या माणसांचा आधार घ्या,दररोज अभ्यास सुद्धा सुरू ठेवा,काहीतरी नवीन गोष्टी आत्मसात करा,यासारख्या बऱ्याच सूचना देऊन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला .पुढील वर्षी याही पेक्षा जास्त प्रयत्न करून अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रातही आपले विद्यार्थी चमकवायचे हे आवाहन स्वीकारून शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांचा निरोप घेतला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here