सांगोला (प्रतिनिधी)- १० ऑगस्ट रोजी सांगोला तालुक्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे भाग्यविधाते, राजकारणाबरोबरच समाजकारण, सहकार, शिक्षण, शेती व पाणी या क्षेत्रात भरीव कामगिरी करून महाराष्ट्रातील लोकमानसावर ठसा उठवणारे, राजकारणात दंतकथा ठरलेले असे विश्वविक्रमी नेतृत्व, संपूर्ण आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षातच राहून पक्ष आणि जनतेशी इमानदारी व बांधिलकी जपुन अनेक पक्षीय प्रलोभनाला बळी न पडता ध्रुवताऱ्याप्रमाणे अचल राहणारे, महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांची जाण व भान असणारे, शेतकरी कामगार पक्षाची ओळख जगभर करून देणारे नेतृत्व, शेतकरी, शेतमजुर आणि कामगारांसाठी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी व्यतीत करणारे, सांगोला तालुक्याचे दैवत व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला चे संस्थापक अध्यक्ष स्व.आम.डॉ. गणपतराव देशमुख यांची जयंती मोठ्या उत्साहात न्यू इंग्लिश स्कूल सांगोलाच्या कॅम्पस मध्ये संपन्न झाली. सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, सांगोला या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
सदर प्रतिमा पूजन व वृक्षारोपन कार्यक्रम श्रीमती रतनाबाई गणपतराव देशमुख, सौ. सुरेखाताई चंद्रकांत देशमुख, संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख, डॉ.सौ.आस्था अनिकेत देशमुख, संस्थेचे सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे सर, संस्था सदस्य प्रा, अशोकराव शिंदे, प्रा दीपक खटकाळे, प्रा जयंत जानकर व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी, न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे प्राचार्य प्रा. केशव माने व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे प्राचार्य श्री. दिनेश शिंदे सर, उपप्राचार्य प्रा संतोष जाधव, पर्यवेक्षक श्री दशरथ जाधव सर, श्री तातोबा इमडे सर, डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अशोक कांबळे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ इंदिरा येडगे व सौ स्मिता इंगोले मॅडम या सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला या शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी स्व.आम.डॉ. गणपतराव देशमुख यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजने मार्फत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख व संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर यांच्या शुभहस्ते डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.ज्योतिबा हुरदुके, प्रा संतोष राजगुरू व वृक्षारोपन कमिटीचे चेअरमन प्रा. अक्षय माने तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे प्रा मिलिंद पवार, प्रा दत्तात्रय देशमुख, प्रा अरुण बेहेरे व प्रा जुलेखा मुलाणी यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच एक पेड माँ के नाम या मोहिमे अंतर्गत एन.सी.सी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे.व्ही ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाडाचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले. अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक