लक्ष्मीदेवी विद्यामंदिरमध्ये व्यक्तिमत्व विकासावर व्याख्यान संपन्न

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी): इ. 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना कमी वेळात जास्त अभ्यास करावा, एकाग्रता कशी वाढवावी, रोजच्या जीवनात आपणाकडे असलेल्या ऊर्जेचा वापर विधायक पद्धतीने करून जीवनात यशस्वी कसे व्हावे. यासाठी नांदेड येथील मानसशास्त्र विषयाचे प्रा. रमेश सोनुले यांचे व्याख्यान संपन्न झाले.

प्रा. सोनुले यांनी विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेसाठी मेणबत्तीच्या सहाय्याने त्राटक करणेचा प्रयोग विद्यार्थ्यांना करून दाखविला. दररोज त्राटक केल्यास एकाग्रता वाढून, केलेला अभ्यास लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. त्याबरोबरच अभ्यासात प्रगती होते.

झोपेच्या अल्फा, बीटा, थीटा व डेल्टा या अवस्था आहेत. यामधील अल्फा अवस्था म्हणजेच पहाटेची वेळ असते. या अवस्थेत अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता वाढते.तसेच दिवसभर ताजेतवाने राहून मन आनंदीत राहते.

सदर व्याख्यानासाठी संस्था सदस्या सौ. रजनी भोसले, प्राचार्य हेमंत आदलिंगे, पर्यवेक्षक प्रा. सुभाष आसबे, श्री. अमोल केंगार, श्री. अमोल वाघमोडे तसेच इतर स्टाफ उपस्थित होता.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here