प्रतिनिधी (सांगोला): सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ सेवा संघ, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०८/०५/२०२५ रोजी सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत, कमलापूर येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पडले.
आज समाजातील प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीला कायदयाचे ज्ञान प्राप्त व्हावे या करीता हे शिबिर भरवले होते. या शिबीरामध्ये १. १ मे महाराष्ट्र दिन, २. १ मे जागतिक कामगार दिन, ३. २२ मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस हे विषय निवडण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगोला न्यायालयाचे दिवाणी न्यायधीश श्रीमती. बी.एम.पोतदार मॅडम यांनी भूषविले. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून सांगोला दिवाणी न्यायालयाचे २ रे सह दिवाणी न्यायाधीश श्री. एस.एस.साळुंखे साहेब, सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्ष श्री एम.एन.ढाळे, सांगोला विधीज्ञ संघाचे सचिव अॅड श्री. अजय तोरणे, सांगोला विधीज्ञ संघाच्या सह सचिव श्रीमती एस.व्ही.बोत्रे, पंचायत समिती, सांगोला यांचे वतीने श्री. पुकळे साहेब, श्री. तोडकरी साहेब, तसेच कमलापूर गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कमलापूरचे ग्रामसेवक श्री. खटकाळे इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक सांगोला विधीज्ञ संघाचे जेष्ठ सदस्य अॅड श्री व्ही.बी.चव्हाण यांनी केले. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांगोला विधीज्ञ संघाचे सदस्य अॅड श्री. व्ही.एस. बेले यांनी केले.
या शिबीरामधील १ मे महाराष्ट्र दिन या विषयावर बोलताना अॅड श्री. टी.एम.टकले यांनी १ मे १९६० रोजीची संयुक्त महाराष्ट्र चळवळ व तिचे कार्य नमूद केले. तसेच १ मे हा केवळ एक दिवस नसून प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला स्फूर्ती, चेतना, चैतन्य देणारा दिवस असल्याचे नमूद केले.
या शिबीरामधील दुसरा विषय १ मे जागतिक कामगार दिन, हा होता. या विषयाचे महत्व सांगताना अॅड एस.के.बनसोडे यांनी कामगार चळवणीचा उगम ते कामगारांकरीता बनविण्यात आलेल्या कायद्यांचे अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. तसेच असंघटीत कामगारांना असणारे अनेक कायदे त्यांनी सांगून प्रत्येकाला कायदयाचे महत्व पटवून सांंगितले.
शिबीरामधील तिसरा व महत्वाचा विषय होता २२ मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस या विषयावर सांगोला विधीज्ञ संघाचे सदस्य अॅड श्री. ई.डी. कमले यांनी मार्गदर्शन केले. आज बदलत्या वातावरणामध्ये बदल घडविण्यासाठी व पृथ्वीचा होणारा -हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने पाणी, हवा, झाडे यांचे संगोपन तसेच पृथ्वीवरील प्रत्येक जिव जंतूचे जैविक पध्दतीने जतन व संगोपन करणे काळाची गरज असल्याचे नमूद केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात दिवाणी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून श्रीमती बी. एम पोतदार मॅडम यांनी शिबारामध्ये उपस्थीत नागरिकांना संबाेधीत करताना शिबीरातील प्रत्येक विषयावर अतिशय उत्तम मार्गदर्शन केेले. तसेच सामाजीक क्षेत्रामध्ये काम करणा-या महीलांचे हक्क व अधिकारी अबाधीत राखता यावेत याकरीता बनविण्यात आलेल्या कायदयांची माहीती दिली. कामगार दिनाचे महत्व समजावून सांगताना कामगारांकरीता बनविण्यात आलेल्या अनेक कायदा व योजनांची माहीती सांगितलेी. तसेच महाराष्ट्र दिनाचे महत्व सांगताना त्यांनी संंयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये शहीद झालेल्या१०६ हुतात्म्यांचे स्मरण करुन दिले. तसेच जैवविविधता दिवसाचे औचित्य साधून प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहीजे असे आवाहन त्यांनी या वेळी उपस्थीत नागरिकांना केले. या कार्यक्रमास महीलांचाही भरघोस प्रतिसाद होता. या शिबीराचे आयाेजन केल्याबद्दल त्यांनी कमलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच, रावसाहेब अनुसे, उपसरपंच, नितीन काळे, माजी सरपंच सौ कलावती बंडगर, सर्व ग्रामपंचाय सदस्य, ग्रामस्थ व ग्रामसेवक यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्ष श्री. एम.एन.ढाळे यांनी केले. हा कार्यक्रम आयोजीत करणेकामी न्यायालयातील कर्मचारी श्री. वाय.जी. तारे, श्री. पी. बी. शिंदे, श्री. संतोष शिंदे यांनी परिश्रम घेतले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक