महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे.
उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.कुठे पाहाल निकाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.targetpublications.org
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक