उद्घाटन नामदार उदय सामंत यांच्या हस्ते होणार
सांगोला (अमर कुलकर्णी )महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे हिरक महोत्सवी वार्षिक अधिवेशन रत्नागिरी येथे दिनांक 21 व 22 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी ना. उदय सामंत यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत 21 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.योगेश कदम हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. कोकण विभाग ग्रंथालय संघ, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ व स्वर्गीय आ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे बालाजी मंगल कार्यालय शांतीनगर स्टाॕप नाचणे येथे संपन्न होणार आहे.अधिवेशन अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमिञ डाॕ.गजानन कोटेवार असणार आहेत .
नवलाई देवी मंदिर येथून अधिवेशन स्थळापर्यंत भव्य ग्रंथ दिंडी सोहळा निघणार आहे कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष उद्योजक दीपक शेठ गद्रे हे जबाबदारी पार पाडणार आहेत.

साहित्य कृष्णाजी कुलकर्णी ,विश्वस्त शाम जोशी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तसेच राज्याचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर ,कोकण विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह ग्रंथमिञ सोपानराव पवार कार्योपध्यक्ष ग्रंथमिञ राम मेखले ,कोषाध्यक्ष भीमराव पाटील कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे, स्थायी समिती सचिव सुनील कुबल ग्रंथालय कर्मचारी प्रतिनिधी ग्रंथमिञ नंदू बनसोड इत्यादी मान्यवर उपस्थित लावणार आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र कुमार तथा भाई कालेकर तर सूत्रसंचालन अंजली बर्वे व श्रीकांत पाटील करणार आहेत.
दिलीप कोरे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद चांगदेव काळे, ग्रंथमिञ कुंडलिक मोरे ,नईस खान पठाण ,अंजली बर्वे, अरविंद कुलकर्णी, खंडेराव नाईक ,भगवान घेरडे, मनीषा सावंत ,संतोष चतुर्भुज हे आपले अनमोल मनोगत व्यक्त करणार आहेत अमरावती ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे अनुदानाशिवाय ग्रंथालयाला उत्पन्नाचे साधन कशी वाढवावी यावर चर्चासत्र घेणार आहेत. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघ रत्नागिरी विशेष सर्वसाधारण सभा संपन्न होणार आहे

सायंकाळी प्रसिद्ध गायक गुरुदेव नांदगावकर व त्यांचे सहकलाकार अभिजीत मराठी भावगीतांचा गंध फुलांचा हा सुमधुर कार्यक्रम सादर करणार आहेत.
रविवारी 22 फेब्रुवारी 2026 रोजी नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॕ. दत्ता परदेशी यांच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरीतील शताब्दी ग्रंथालय या विषयावर परिसंवाद होणार आहे तसेच दीपक पटवर्धन, मधुकर जोशी, अरुण इंगोले, गजानन जोशी, जयंत आराध्ये ,आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे प्र.ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, शालिनीताई इंगोले, डॉ. राजेश पाटील. रामदास साठे , सुनील हुसे,स.र. जोपुळे ,रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक, ग्रंथालय निरीक्षक हेमंत काळोखे इत्यादी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.अधिवेशनाचा समारोप रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष संभाजी सावंत हे करणार आहेत तरी राज्यातील सर्व ग्रंथालय कर्मचारी पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ,रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ ,कोकण विभाग ग्रंथालय संघ यांचे वतीने करण्यात आले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



