सोनंद केंद्रात विद्यालयाचा प्रथम क्रमांक
माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ,पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी /मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,महात्मा फुले विद्यालय,डोंगरगाव या प्रशालेतून परीक्षेस बसलेल्या 57 विद्यार्थ्यांपैकी 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल 96.49 टक्के लागला असून प्रशालेने सोनंद केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनीही उत्तम गुण मिळवून प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी ठरलेले विद्यार्थी कु.मेघा संजय उतळे 92.20 टक्के केंद्रात द्वितीय व प्रशालेत प्रथम क्रमांक,कु.संजना शिवाजी सुतार 86.20 टक्के प्रशालेत व्दितीय क्रमांक,कु.मेघा महालिंग गवळी 84.00 टक्के तृतीय क्रमांक,कु.माधुरी आप्पासो वाघमारे 80.00 टक्के चतुर्थ क्रमांक,कु.प्रियांका संजय डवरी 75 टक्के
तसेच सेमी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला असून सेमी माध्यम सोनंद केंद्रात प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी कु.निकिता बाळासो बाबर 91.20 टक्के केंद्रात प्रथम,कु.जान्हवी जगन्नाथ बाबर 87.80 टक्के केंद्रात द्वितीय,कु.प्रांजली लक्ष्मण जाधव 84.60 टक्के केंद्रात तृतीय ,ऋग्वेद हनुमंतराव मिसाळ 84.60 टक्के केंद्रात तृतीय,कु.गौरी शहाजी शिंदे 82.80 टक्के केंद्रात चतुर्थ, कु.साक्षी संदीप उतळे 78.00 टक्के, कु.शुभांगी भारत काळे 76.40 टक्के,अभिजीत नितीन बाबर 76.40 टक्के, योगेश युवराज राजगे 76.20 टक्के गुण मिळवून गुणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्था पदाधिकारी व डोंगरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांचे तर्फे हार्दिक अभिनंदन व कौतुक करण्यात आले.तसेच प्रशालेमध्ये चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अनिवासी गुरुकुल प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक