शहीद अशोक कामटे आणि गाडगे महाराज जयंती साजरी

0

सांगोला (प्रतिनिधी): सार्वजनिक स्वच्छता ,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. संत गाडगे महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले संत होते .समाजातील अज्ञान ,अंधश्रद्धा भोळ्या समजुती ,अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी गाडगे महाराजांनी आपले आयुष्य वेचले असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते बाबुराव लाडे यांनी केले.

ते शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने आयोजित केलेल्या राष्ट्रसंत गाडगे महाराजांची 150 वी , अशोक कामटे यांची 61 वी जयंतीनिमित्त त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

सुरुवातीस स्टेशन रोड येथील संघटनेच्या तोरणा कार्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज व शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेचे पूजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संघटनेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.

यावेळी अनिल तारकर , माजी तालुकाध्यक्ष गणेश पाटोळे , विजय कांबळे,बाळकृष्ण टापरे ,दीपक पाटोळे सदस्य उपस्थित नागरिकांनी महापुरुषांच्या प्रतिमेस फुले वाहून अभिवादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलकंठ शिंदे सर , आभार मकरंद पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक कामटे संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here