जि.प. प्रा शाळा सावे येथे माता पालक संघ मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी): जि.प.प्रा शाळा सावे येथे माता पालक संघ मेळावा व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ वैशाली देवकते उपस्थित होत्या . प्रमुख पाहुणे म्हणून डॉ निकिता बाबासाहेब देशमुख मॅडम व सांगोला पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाच्या प्रमुख पीएसआय स्नेहल चव्हाण मॅडम ,माजी सभापती मायाक्का यमगर मॅडम , सावे गावचे सरपंच शिवाजी वाघमोडे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंभू माने , प्रा सौ उषा देवकते ,अभिता वाघमोडे ,लक्ष्मी चव्हाण , डॉ जयश्री काशीद मॅडम शाळा व्यवस्थापन समिती सदस्या कल्पना गावडे ,मुमताज खान , अर्चना माने , सविता सुतार , ग्रामपंचायत सदस्या सुजाता रड्डी, सविता इमडे ,लता पारसे , स्वाती माने उपस्थित होत्या .

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला . सदर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ निकिता बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित सर्व महिलांना महिलांचे व मुलांचे आरोग्य याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे याकरिता आरोग्याची काळजी घेणे ही सध्या काळाची गरज बनली आहे तसेच जुन्या चालीरिती व रूढी परंपरा बंद करून विधवा महिलांनाही सन्मान मिळावा असे मत व्यक्त केले .

स्नेहल चव्हाण मॅडम यांनी आपल्या मनोगतांमध्ये सायबर गुन्हे ,मोबाईलच्या वापर करत असताना मुलींनी आपली सुरक्षितता कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले .प्रा उषा देवकते यांनी आपल्या मनोगतामध्ये माता पालक मेळावा व मकर संक्रांत सणाविषयी मार्गदर्शन केले .

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका खंकाळ मॅडम यांनी केले .सूत्रसंचालन शिंदे मॅडम यांनी केले व आभार शाळेची विद्यार्थिनी अंकिता स्वामी यांनी मानले . सदर कार्यक्रमासाठी महिला माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रमुख व मान्यवरांच्या मनोगतानंतर सदर कार्यक्रमात हळदीकुंकू चा कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमानंतर शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने सर्व महिलांकरीता व विद्यार्थ्यांकरिता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले .

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here