सांगोला तालुक्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोंगरगाव येथे मातृभूमी प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आमदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व मातृभूमी प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.
यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. प्रविण काळे, जगदंबा कन्स्ट्र्शनचे मालक श्री.नागेश जगताप, शाळेचे मुख्याध्यापक श्री.अंकुश वाघमोडे, उपशिक्षक शत्रुघ्न कोकणी, श्रीमती वैशाली शिंदे, मातृभूमी प्रतिष्ठानचे सदस्य श्री.विनोद काळे, श्री.औदुंबर काळे, सौ.अश्विनी जगताप उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नागेश जगताप यांनी केले व शेवटी मुख्याध्यापक अंकुश वाघमोडे यांनी सर्वांचे आभार मानले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक