वाणीचिंचाळे येथे माझी वसुंधरा अभियान आढावा बैठक संपन्न

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी):  आज ग्रामपंचायत वाणी चिंचाळे येथे माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत जनजागृती करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेवाणी चिंचाळे येथे . सदर कार्यक्रमासाठी श्री. उमेशचंद्र कुलकर्णी साहेब (मा. गटविकास अधिकारी वर्ग 1) पंचायत समिती सांगोला,श्री. अमोल तोडकरी साहेब (विस्तार अधिकारी पंचायत ), श्री.देवराव पुकळे साहेब (विस्तार अधिकारी पंचायत ),श्री. मिलिंद सावंत साहेब (विस्तार अधिकारी आरोग्य )यांनी उपस्थित राहून नागरिकांना भूमी, जल, अग्नी,वायू व आकाश या वसुंधरेच्या 5 तत्वाविषयी माहिती देऊन वसुंधरेचे रक्षण कशा प्रकारे केले जाऊ शकते याबद्दल मार्गदर्शन केले.

माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत दिनांक 1 जुन 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत आहे.

या कालावधीत निर्देशाकानुसार नियोजनबद्ध काम करणे आवश्यक आहे. यामध्ये वातावरणीय बदल जनजागृती, ई-प्लेज नोंदणी व पुर्तता, स्पर्धा, सोशल मीडियाद्वारे अभियानाची प्रसिध्दी, सार्वजनिक ठिकाणी जनजागृती उपक्रम, पर्यावरण सेवा येाजनेत शाळांचा सहभाग आदींचा समावेश आहे. जेणेकरून भूमी, वायु, जल, अग्नि, आकाश या क्षेत्रात गुणांकन सुधारता येतील. तसेच, अभियांनाची माहिती संकलन व मुल्यांकनाचा त्रुटींचीही माहिती देवून नियोजनपूर्वक सुधारणा करण्याच्या सूचनांही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी माजी सरपंच चिदानंद स्वामी, लक्ष्मण निळे, रामलिंग पाटील, विकास गडहिरे, जितेंद्र गडहिरे , बाळासाहेब गडहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक सुनील साळुंखे यांनी केले.यावेळी सरपंच प्रियांका गडहिरे, बचत गटाच्या खरात ग्रामसेवक करचे,गोरख येजगर,शेखलाल शेख,बंडु सोपे, बाबुराव सोपे, सुकदेव गंगाधरे, नितीन स्वामी आण्णा गवळी, संजय खडतरे,पत्रकार सचिन गायकवाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाबर,कर्वे गुरुजी अशोक गंगाधरे गुरूजी यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभियानात वृक्ष लागवड करणे महत्त्वाचे असल्याने यावेळी गुरुदत्त वाचनालयाचे अशोक गंगाधरे गुरुजी यांनी 50 पिंपळाची तसेच विस्तार अधिकारी तोडकरी यांनी 50 झाडे या अभियानास भेट देण्याचे जाहीर केले.यामुळे त्यांच्या कृतीचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here