कमलापूर गावचे शेकापचे नारायण बंडगर यांचे निधन

0

कमलापूर (प्रतिनिधी):कमलापूर गावचे, हर हुन्नरी व्यक्तिमत्व, साधा,सरळ,मितभाषी सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व,शेतकरी कामगार पक्षाचे माजी ग्रामपंचायत सदस्य,नारायण गणू बंडगर यांचे कमलापूर अजनाळे रोडवर अपघाती दुःखद निधन झाले. निधन समयी ते 67 वर्षे होते.स्वर्गीय आ.गणपतराव देशमुख व आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यावर प्रचंड प्रेम असणारे नारायण बंडगर होते.

समाजकारण व अर्थकारणामध्ये हिरवेने सहभागी होत असत.प्रसिद्ध असा जर्सी गाईचा गोठा आदर्श गोटा म्हणून सांगोला व आसपासच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मानसिद्ध दूध डेअरीचे चेअरमन, कमलापूर विकास सेवा सोसायटीचे संचालक दिलीप बंडगर व चंद्रकांत बंडगर यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कमलापूर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा तिसरा दिवस माती सावडण्याचा कार्यक्रम वार सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी सकाळी सात वाजता कमलापूर स्मशानभूमी मध्ये होणार आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here