माजी आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांच्या मागणीस यश
सांगोला (प्रतिनिधी) :- सांगोला तालुक्याचे माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन भव्य एम. आय. डी. सी .उभारावी अशी मागणी उद्योगमंत्री नाम.उदय सामंत यांची भेट घेऊन केली . सांगोला तालुक्यातील तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नवीन एम. आय. डी. सी .मंजूर करण्याचे आश्वासन माजी आम. अँड. शहाजीबापू पाटील यांना दिले आहे.
नवीन एम.आय.डी.सी मुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या मागणीला मोठे यश आले आहे. भविष्यात उद्योग व्यवसाय वाढल्याने तालुक्यात क्रांती होईल अशी माहिती सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीप्रसंगी उद्योगपती अभिजीत नलवडे ,योगेश खटकाळे, विशाल खटकाळे हे मान्यवर उपस्थित होते.
माजी आम.ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या मागणीला व पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. नवीन एम .आय. डी. सी. निर्मितीमुळे भविष्यात तालुक्यात उद्योगाचे जाळे निर्माण होवून तालुक्याची अर्थव्यवस्था बळकट होईल . तरुणांना नोकरी मिळेल. त्यामुळे सांगोला तालुक्याचा व्यापारीदृष्टया विकास होईल व तालुक्याच्या विकासास चालना मिळेल. व्यापारी व औद्योगिकदृष्ट्या तालुक्याचा कायापालट होणार आहे अशी माहिती माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक