महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेच्या 2025 च्या तारखेत बदल केला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मूळ वेळापत्रकानुसार, NMMS परीक्षा रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणार होती. परंतु, आता या तारखेत बदल करण्यात आला असून, ही परीक्षा आता रविवार, 28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, 21 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ देखील आयोजित करण्यात आली आहे. एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये आणि परीक्षा केंद्रांवरील व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी NMMS परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



