प्रतिनिधी (शशि हातेकर): गौडवाडी ता.सांगोला येथील ग्रामस्थांच्या वतीने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या युवक आणि युवतींचे सत्कार करण्यात आले.यामध्ये जयसिंग शंकर गुळीग (पोस्ट खात्यामध्ये MTS पदी निवड), साक्षी संगाप्पा सरगर (मुंबई कारागृह पोलिस), आनंद पांढरे (संचालक, भांडुप सहकारी संस्था), तारखेश्वर दादासाहेब खांडेकर (मुंबई पोलिस) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीमंत सरगर,माणिक सकट, आप्पा माळी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी गावातील तरुणांना यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यश मिळवावे असा मौलिक सल्ला दिला.तसेच त्यांनी सत्कार मूर्तींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोपट गडदे, विशाल गुळीग , सोपान शिंगाडे, पोपट गुळीग, महादेव आलदर,संजू मुकादम, सदा गडदे, लिंगा आवळे, हेमंतकुमार कांबळे, अशोक कांबळे, तुषार गुळीग ,संजय माळी, तात्या किंग चहा वाला, दत्ता गुळीग, आणि पंचक्रोशीतील गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक