प्रतिनिधी (शशिकांत कोळी): इ. पहिली ते बारावी वर्गांची पालक सभा दिनांक28/09/2024 रोजी झाली .या सभेला पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच काही पालकांनी आपल्या पाल्यात चांगल्या प्रकारे सुधारणा झाल्या आहेत अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शाळेच्या परिसरातील वातावरण, तसेच शाळेची शिस्त चांगली आहे. असे त्यांनी त्यांच्या प्रतिसादातून व्यक्त केले. या पालक सभेसाठी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य हेमंत आदलिंगे, मुख्याध्यापिका सौ. पुष्पाताई महांकाळ मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने शाळेत राबवलेले उपक्रम तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढण्यासाठी घेतलेले उपक्रम यांची माहिती दिली.
सर्व पालकांनी सुसंवाद साधून पालक सभेची सांगता केली. यावेळी संस्थेच्या संस्था सदस्या सौ रजनीताई भोसले मॅडम उपस्थित होत्या. पालक सभेचे चर्चासत्र जवळ पास एक तासभर चालूच होते. नंतर सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचा घटक चाचणीचा निकाल पाहिला. पाल्याची प्रगती वर्ग शिक्षकांकडून जाणून घेतली. त्याचवेळी इ. दहावी, बारावी वर्गांचीही पालक सभा स्वतंत्रपणे घेऊन पालकांना त्यांच्या पाल्याची प्रगती सांगितली. दहावी,बारावी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यास घरी जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी द्यावा. असे बर्याच शिक्षकांकडून सांगितले.
पालक सभेसाठी पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद होता. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जादा तास, साप्ताहिक टेस्ट या उपक्रमांचे पालकांनी कौतुक करुन लक्ष्मीदेवी विद्यामंदिरकडून आमच्या पाल्याची चांगली तयारी करुन घेतली जाते. विद्यार्थ्यांची प्रगती होत असल्याचे सांगितले. पर्यवेक्षक सुभाष आसबे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक