पोलिस उपनिरीक्षक नितीन देवळे यांचा गोडसेवाडी शाळेत सत्कार संपन्न

0

गोडसेवाडी (प्रतिनिधी):जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोडसेवाडी (कमलापूर) येथे गुरुवार दि. २० नोव्हेंबर माजी विद्यार्थी व प्रतिष्ठित मान्यवरांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले शाळेचे माजी विद्यार्थी श्री नितीन रामचंद्र देवळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

आपल्या सत्कारानंतर बोलताना श्री. देवळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गरजा व भौतिक सुविधांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी दाखवलेली ही तत्परता उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.यावेळी आयडीएफसी बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर श्री अमोल गोडसे यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला कमलापूर केंद्राचे केंद्र प्रमुख श्री पवार साहेब आणि कमलापूर केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री मुलाणी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे कौतुक केले.शाळेच्या वतीने उपस्थित सर्व पाहुण्यांचे आणि केंद्र प्रमुखांचे मुख्याध्यापकांनी आभार मानले. माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here