उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महत्वकांक्षी संकल्प
‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चे भव्य लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ समारंभ उत्साहात संपन्न* पुणे: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ या सामाजिक उपक्रमाचे भव्य लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ समारंभ रविवारी पुण्यातील JW Marriott हॉटेल येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेरणादायी वातावरणात पार पडला. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आयुषमान भारत मिशनचे डॉ. ओमप्रकाश शेटे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, मंत्रालय तथा विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, डिजीटल मीडिया संघाचे राजा माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिबिंब प्रतिष्ठान संस्थेच्या ध्येयधोरणांची माहिती देण्यात आली आणि संस्थेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या विशेष समारंभात राज्यभरातून आलेल्या डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींना ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.
चंद्रकांतदादा पाटील यावेळी म्हणाले,“डिजिटल माध्यमांनी माहितीचा प्रसार वेगवान व व्यापक केला आहे. मात्र, पत्रकारांच्या मागे उभं असलेलं कुटुंब त्याग करतं, हे विसरता कामा नये. अशा पार्श्वभूमीवर ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ सारखी संस्था ही काळाची गरज आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे ”, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी पाटील यांनी प्रतिबिंब प्रतिष्ठान मार्फत राज्यातील १२००० पत्रकारांचा विमा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली. ज्यामध्ये प्रत्येकाला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, आजचा पत्रकार केवळ माहिती पुरवणारा नाही, तर समाजमन घडवणारा प्रभावी घटक आहे. ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ ही संस्था पत्रकारांच्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांच्या कुटुंबाचाही विचार करते, ही अत्यंत स्तुत्य बाब आहे.”
जयकुमार गोरे यांनी सांगितले,“पत्रकार समाज हा समाजाचे आरसे असतो. त्यांचे योगदान मोठे असूनही त्यांच्या कुटुंबाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ ही संस्था या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पत्रकारांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास, मूल्यसंस्कार आणि स्पर्धात्मक क्षमतांचा विकास घडवण्यासाठी ही संस्था मोलाची भूमिका बजावेल.”
संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक राजा माने यांनी सांगितले,“पत्रकारिता ही केवळ माहिती पुरवण्याचे माध्यम नाही, ती समाजाचे प्रतिबिंब आहे. म्हणूनच संस्थेला ‘प्रतिबिंब’ हे नाव दिले आहे. पत्रकारांच्या मुलांसाठी एक सशक्त, सकारात्मक व्यासपीठ निर्माण करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. पत्रकार कुटुंबांसाठी हे एक विश्वासार्ह आधार केंद्र ठरेल, याची आम्हाला खात्री असल्याचे ते म्हणाले.
पत्रकार कुटुंबांसाठी ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’
पत्रकारांच्या मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिबिंब प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. पत्रकारांचे जीवन धकाधकीचे आणि तणावपूर्ण असल्याने त्यांच्या कुटुंबाकडे, विशेषतः मुलांकडे, वेळ देणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर ही संस्था शिक्षण, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, मूल्यसंस्कार, कला-क्रीडा आणि करिअर मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये उपयुक्त उपक्रम राबवणार आहे.
पुरस्कार विजेते – महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५
सामाजिक, शैक्षणिक, उद्योग आणि पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कारार्थी:
डॉ. किरण सावे, पालघर – आदिवासी शिक्षण
बिग हिट मीडिया – अनुष्का सोलवट, ऋतिक मणी, अनिल मणी
सचिन वायकुळे, बार्शी – तृतीयपंथीय आणि देहविक्रय क्षेत्रातील महिलांसाठी कार्य
डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, कंधार – शिक्षण व ग्रामविकास
उमाकांत मिटकर, नळदुर्ग – भटक्या-विमुक्त विकास
मोहन डांगरे, सोलापूर – महिला सक्षमीकरण
प्रशांत मोरे, महाबळेश्वर – युवा उद्योजक
संजय कोठारी, जामखेड – सामाजिक कार्य
नामदेवराव खराडे – साखर उद्योग
स्वप्निल परदेशी – चिक्की उद्योग
विजय राऊत – शिक्षण, क्रीडा, साहित्य
संदीप शिंदे – बेघर मनोरुग्ण पुनर्वसन
शिवराम घोडके – प्रगत शेती
आतिश शिरसाट – बेवारस मनोरुग्ण पुनर्वसन
भास्कर घुले – श्री विघ्नहर साखर कारखाना
संतोष ठोंबरे – ग्रामविकास
मानसिंगराव चव्हाण – सहकारी साखर उद्योग
शुभम पसारकर – दिव्यवंदना आधार फाउंडेशन
पत्रकारिता पुरस्कार:
* सरिता कौशिक – एबीपी माझा
* साहिल जोशी – मुंबई तक
* संजीव उन्हाळे – ज्येष्ठ पत्रकार
* भारत चव्हाण – लोकमत
* दिलीप सपाटे – मंत्रालय वार्ताहर संघ
डिजिटल स्टार पुरस्कार:
नितीन पाटील – पोलीसनामा
* अश्विनी जाधव – लोकमत डिजिटल
* अभिजीत दराडे – मटा डिजिटल
* विष्णू सानप – लेटसअप
* ओमकार वाबळे – मुंबई तक
यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्या संयोजन समितीतील सदस्य,पदाधिकारी सतीश सावंत, महेश कुगांवकर, नंदकुमार सुतार, केतन महामुनी, शामल खैरनार, राजू वाघमारे, विकास भोसले, तेजस राऊत, इक्बाल शेख, दिपक नलावडे, अमोल पाटील, अजिंक्य स्वामी, गणेश हुबे, प्रशांत साळुंके यांची देखील उपस्थिती होती.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक