केंद्रस्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा होणार सन्मान
मंथन वेल्फेअर फाउंडेशन अहमदनगर संचलित मंथन स्पर्धा परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय स्पर्धा परिक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक २०/०७/२०२५ रोजी सकाळी १०वा. आनंद लॉन्स वासुद रोड सांगोला येथे संपन्न होणार असल्याची माहिती स्पर्धा परीक्षा तालुका समन्वयक श्री. समाधान केदार यांनी दिली आहे.
हा पारितोषिक वितरण समारंभ प्रा. डॉ. बापुसाहेब आडसुळ प्रदेशाध्यक्ष एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटना यांच्या शुभहस्ते तर मा. सुयोग नवले साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सांगोला, मा. अमोल भंडारी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती सांगोला, मा. चंद्रकांत पुजारी पोलिस उपनिरीक्षक सांगोला, मा. भारत इंगवले आर.एस.पी. अधिकारी, मा. रामचंद्र जानकर तालुकाध्यक्ष मुख्याध्यापक संघ सांगोला, मा. निवास येलपले माजी चेअरमन जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्था सोलापूर व स्पर्धा परीक्षा सहसमन्वयक सौ. प्रियांका केदार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी या पारितोषिक वितरण सोहळ्यास केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्पर्धा परीक्षा तालुका समन्वयक समाधान केदार यांनी केले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक