सांगोला रेल्वे स्टेशनवर कोच इंडिकेटरची सुविधा करावी :– अशोक कामटे संघटना 

0

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला रेल्वे स्टेशनवर अनेक वर्षांपासून कोच इंडिकेटरची सोय नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. सदरची सुविधा तात्काळ करण्यात यावी या मागणीचे निवेदन शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.

सांगोला रेल्वे स्टेशनवर दररोज पाच ते सात रेल्वेची आवक– जावक असते पण प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे संरचनेचे रेल्वेचे डबे कोणत्या ठिकाणी गाडी आल्यावर येऊ शकतात हे प्रवाशांना समजणे अवघड आहे. मुळातच सांगोला स्थानकावर सर्व रेल्वे गाड्यांना दोन मिनिटांचा थांबा असल्याने आरक्षित प्रवाशांना नेमका आरक्षणाचा कोच शोधणे अवघड जात आहे . कोल्हापूर –कलबुर्गी, पंढरपूर –यशवंतपूर (बेंगलोर), कोल्हापूर –नागपूर, कोल्हापूर –धनबाद, दादर –सातारा या एक्सप्रेस, मेल एक्सप्रेस सांगोला येथून जातात.कमी वेळात आपला तिकीट वरील आरक्षण बोगी शोधणे अशक्य काम आहे,त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे, कदाचित त्यामुळे रेल्वेही सुटू (प्रस्थान)शकते संबंधित रेल्वे प्रशासनाने कोच इंडिकेटरची सुविधा निर्माण केल्यास प्रवाशांची मोठी गैर सोय दूर होणार आहे या समस्येचा पत्रव्यवहार आपल्या रेल्वे विभागाकडे अनेकवेळा केलेला आहे.

त्याकरिता आपल्या रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ सांगोला स्टेशनवर कोच इंडिकेटर बसवण्याची कार्यवाही करावी ही विनंती. या निवेदनाच्या प्रती मा. खासदार धैर्यशील मोहिते– पाटील , मा. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर . मध्य रेल्वे विभाग यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी अशोक कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

सांगोला स्टेशन येथील 900–950 (सुमारे एक किलोमीटर) मीटरचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोन असून 19–22 डब्यांची एखादी एक्सप्रेस रेल्वे जर आली तर डब्याची संरचना समजणे प्रवाशांना जिकीरीचे काम आहे, त्यामुळे प्रवाशांची या दोन मिनिटांमध्ये पंचायत होते ,सांगोला हे मिरज– कुर्डूवाडी लोहमार्गावरील प्रमुख स्टेशन असून प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर कोच इंडिकेटरची सुविधा द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. 

– निलकंठ शिंदे सर, अध्यक्ष अशोक कामटे संघटना

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here