पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने मार्फत केवड हे गाव दत्तक घेतले होते.या गावी पूर परिस्थितीमुळे गावावरती सामाजिक व आर्थिक संकट उभा राहिलेलं होते. यासाठी महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्यामार्फत गावामध्ये स्वच्छता करण्यात आली.

व गावातील लोकांना प्रबोधन व पुढील आयुष्यासाठी कशी उभारी मिळेल यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रकाश महानवर साहेब व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. राजेंद्र वडजे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल व प्रा. समाधान कदम, प्रा. प्रसाद पवार, प्रा. संकल्प बारबोले, प्रा. श्रद्धा मस्के व श्री.सुहास जवंजाळ यांच्यासह विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम या कार्यक्रमासाठी घेतले. यावेळी केवडगावचे सरपंच मा.राजेंद्र पाटील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष भारत लटके यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ या कार्यक्रमांमध्ये सहभागी होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


