खिलारवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

0

स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काल मौजे खिलारवाडी गावामध्ये समाजसेवक दाजी शिंदे मित्र मंडळ खिलारवाडी यांच्या वतीने गावामध्ये प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन गायगव्हाण गावचे माजी सरपंच श्री शंकर उर्फ बापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार सांगोला शिवसेनेचे समन्वयक श्री शंकर मेटकरी यांच्या हस्ते करण्यात आला.

राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस श्री रोहिदास चौगुले भाऊसाहेब यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी दाजी शिंदे यांच्यावतीने खिलारवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रज्ञाशोध एटीएस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गाय गव्हाण गावचे पोलीस श्री विठ्ठल खांडेकर यांच्या मुलीचा विविध परीक्षेमध्ये नंबर आल्याने तिचाही सत्कार या जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये करण्यात आला.

यावेळी राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी यांच्या जीवन चरित्रावरती महूद ढाळेवाडी येथील शंकर मेटकरी यांचे चिरंजीव संभाजी मेटकरी यांनी विचार व्यक्त केले.

त्यानंतर श्री माजी सरपंच शंकर उर्फ बापू शिंदे यांनी शेती आणि शेतीशी निगडित असणाऱ्या शासकीय योजना आणि त्या कशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यात यावा याची माहिती दिली आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय काळेल सर यांनी विविध विषयावरती आपले विचार व्यक्त केले.

याप्रसंगी खिलारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर, गायगव्हाण विकास सेवा सोसायटीचे संचालक श्री अमोल कांबळे, सेक्रेटरी श्री रोहिदास चौगुले भाऊसाहेब, श्री शंकर मेटकरी, पोलीस विठ्ठल खांडेकर, आम्ही सर्व मित्रमंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here