आर अश्विन याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

0

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनुभवी आणि दिग्गज ऑलराउंडर आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. अश्विनने आंतराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. अश्विनने मालिकेदरम्यान एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे टीम इंडियाला आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. अश्विनच्या या निर्णयासह त्याच्या 13 वर्षीय क्रिकेट कारकीर्दीचा अंत झाला आहे. टीम इंडियसाठी गेली अनेक वर्ष सेवा करणाऱ्या या दिग्गज खेळाडूला निरोपही देता न आल्याची खंत यामुळे व्यक्त केली जात आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ॲडलेडमध्ये झालेला दुसरा कसोटी सामना हा अश्विनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरला. आर अश्विन याने 6 नोव्हेंबर 2011 रोजी विंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. अश्विनने या दरम्यान एकूण 106 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. अश्विनने या दरम्यान 200 डावांमध्ये 537 विकेट्स घेतल्या. अश्विनने 37 वेळा 5 आणि 8 वेळा 10 विकेट्स घेतल्या. तसेच अश्विनने 151 डावांमध्ये बॅटिंग करताना 6 शतकं आणि 14 अर्धशतकांसह 3 हजार 503 धावा केल्या. अश्विनची 124 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. अश्विनने या दरम्यान 23 षटकार आणि 399 चौकार ठोकले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here