सांगोला ( प्रतिनिधी )- कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य राम बाबर यांना चेन्नई येथील दोराई फाऊंडेशनचा एकझेमप्लर अवॉर्ड शुक्रवारी प्रदान करण्यात आला.
श्रीराम हॉटेल सांगोला येथे झालेल्या कार्यक्रमात दोराई फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. सुमित्रा प्रसाद यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर आपुलकी प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आपुलकी प्रतिष्ठानचाही डॉ. प्रसाद यांनी गौरव केला.
आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य राम बाबर हे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असून त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल चेन्नई येथील दोराई फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आली. सन्मानपत्र, शाल, उत्कृष्ट असे पेंटिंग देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सुमित्रा यांचे जावई नारायण वेंकटेशन, बाबर कुटुंबीय, त्याचबरोबर मित्रपरिवार, आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ सुमित्रा प्रसाद म्हणाल्या की, गेल्या ३० वर्षापासून दोराई फाऊंडेशनचे सामाजिक कार्य चालू असून आतापर्यंत ५७ पुरस्कार मिळाले असून यात अमेरिकेच्या पुरस्काराचाही समावेश आहे. सामाजिक कार्याची चळवळ पुढे नेण्यासाठी तरुण पिढीने यात उतरणे गरजेचे असल्याचे सांगून आपुलकी प्रतिष्ठानच्या सुरू असलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची माहिती घेऊन त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन अरविंद केदार यांनी केले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक