वाचनाने सामाजिक परिवर्तन होते- आ. रणजितसिंह मोहीते- पाटील

0

सोलापूर( अमर कुलकर्णी):  वाचनालये वाचनाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचे महत्त्वाचे काम करतात.वाचनाने समाजाचे प्रबोधन केले जाते. वाचन चळवळ वाढणे, वृत्तिंगत होणे गरजेचे आहे. वाचनाचे प्रभावी माध्यम म्हणून शासनमान्य वाचनालये काम करीत आहेत. असे उद् गार आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या 46 व्या वार्षिक अधिवेशनात अरण तालुका माढा येथे बोलताना काढले.यावेळी आ. अभिजीत पाटील म्हणाले की शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांच्या समस्या पंढरपूर तालुक्यातील ग्रंथालय कार्यकर्ते वारंवार सांगत असून त्या मलाही माहित आहेत. मी या समस्या सोडविण्यासाठी सभागृहात प्रश्न उपस्थित करून सोडवून घेण्याचा प्रयत्न करेन. प्रेरणादायी वक्ते सुभाष रणदिवे यांनी आपल्या व्याख्यानाने प्रतिनिधींना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रम अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमिञ गजानन कोटेवार होते. जिल्हा ग्रंथालय संघाने खुले अधिवेशनात अनेक ठराव पारित करून शासनाकडे पाठविण्याचे ठरविले.सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या “ग्रंथालय दिनदर्शिकेचे” व सांगोला तालुका ग्रंथालय संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. उपस्थित प्रतिनिधींच्या शंकेचे निरसन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा या वेळी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

या अधिवेशनास डाॕ.पी.बी.रोंगे सर (स्वेरी पंढरपूर ) ,बाळासो पाटील ,भारत आबा शिंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे तांत्रिक सहाय्यक प्रमोद पाटील, निरीक्षक संजय ढेरे ,राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार पुणे , कार्योपाध्यक्ष राम मेकले लातूर, खजिनदार भीमराव पाटील कोल्हापूर, कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, दशरथ क्षीरसागर धाराशिव , तुळजापूरचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे,पांडुरंग सुरवसे ,ज्योतीराम गायकवाड, कुंडलिक मोरे,विजयकुमार पवार , साहेबराव शिंदे,प्रमोद बेरे, प्रशांत लोंढे ,प्रकाश शिंदे,ॲड. अनिल पाटील, सौ शैलशिल्पा जाधव, सौ शैलजा पवार,सौ सारिका माडीकर, सौ सारिका मोरे, सौ वृषाली हजारे ,सौ छाया मोरे सौ रंजना सरगर, सौ सुनीता रणदिवे, सौ नंदा कुऱले,. रमा ईपलपल्ली,विलास कदम, शिवाजी नागणे, नामदेव कुचेकर, बाळासाहेब शिंदे, सुभाष सुडके, अमर कुलकर्णी, संजय सरगर, अशोक व्हटे,दत्ता पाटील, हरिदास घोडके ,बिरु काळे,रणजित भगत, प्रथमेश बनसोडे, सोमनाथ लोंढे यांच्यासह साडेचारशे ग्रंथालय प्रतिनिधी उपस्थित होते.स्वागताध्यक्ष प्रा. हरिदास रणदिवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुप्रिया किरनाळे यांनी केले तर आभार विनोद गायकवाड यांनी मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here