माढा: रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृती पासून दुरावत चाललेला आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये प्रथम ग्रंथालयाची साफसफाई करण्यापासून सुरुवात झाली. 1 जानेवारी 2025 नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी विद्यार्थिनीचे समूहवाचन घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे ग्रंथ देण्यात आले. विद्यार्थ्यांना निरंतर व सतत वाचनाची सवय लागावी यासाठी कोणती पुस्तके वाचावीत याबाबत ग्रंथपाल प्रा. मीनाक्षी कुंभार यांनी मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रा.लेखिका सुरेखा भालेराव यांना महाविद्यालयामध्ये आमंत्रित करून लेखक वाचक संवाद घडवून आणला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व वाढविण्यासाठी ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागामार्फत ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदवला. स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत माढा तालुक्यातील वेगवेगळ्या स्कूल आर्या पब्लिक स्कूल माढा, गणपतराव साठे हायस्कूल माढा, सावित्रीबाई फुले मुलींची शाळा माढा, गणपतराव साठे जिल्हा परिषद शाळा माढा, या शाळेतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावून ग्रंथ प्रदर्शन दाखविण्यात आले. ग्रंथालयाचा परिचय देऊन वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती देऊन त्यांना संपूर्ण ग्रंथालय दाखविण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात त्यांना सभासद करून घेता येते असेही सांगितले. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांचे पुस्तक परीक्षण घेण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव प्रकल्प राबविण्यात आला. त्यासाठी डॉ. संगीता पैकीकरी, डॉ.अलका घोडके, डॉ.वंदना कवितके श्री.समाधान नेहतराव श्री.गणेश भांगे यांचे सहकार्य लाभले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक