परिवर्तन संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सचिन घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष अॅड. नेहा सुरेश दुबे यांनी नुकतेच घाडगे यांना नियुक्त पत्र दिले आहे.
यावेळी नूतन अध्यक्ष सचिन घाडगे म्हणाले की, परिवर्तन संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असेन.संघटनेच्या माध्यमातून मी सर्व शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवून त्याचा गरजूंना लाभ मिळेल यासाठी आणि सामान्य जनतेचे प्रश्न आणि अडचणी सोडविण्यासाठी मी कायमस्वरूपी प्रयत्न करेन.
या निवडीबद्दल सचिन घाडगे यांचे सर्व स्तरातून कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक