सांगली–परळी– सांगली रेल्वेस जवळा स्थानकावर थांबा द्या:– अशोक कामटे संघटना 

0

परळी रेल्वेस एक्सप्रेसचे डबे जोडा अन्यथा तिकीटदर कमी करा

सांगोला ( प्रतिनिधी): रेल्वे क्रमांक 11411 व 11412 परळी– सांगली डेमो एक्सप्रेस रेल्वेस जवळा स्टेशनवर थांबा मिळावा या मागणीकरीता शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

सांगली मधून परळीकडे जाण्याकरीता रात्रीची शेवटची ही ट्रेन आहे सद्य परिस्थितीत प्रवाशांना एकतर जत रोड किंवा सांगोला येथे उतरून परत उलट दिशेने खाजगी वाहनाने रात्री –अपरात्री प्रवास करावा लागतो सदरच्या उलट द्राविडी प्रवासामुळे या परिसरातील प्रवासी त्रस्त आहेत व सर्वसामान्य लोक जे हॉस्पिटलसाठी रोज ये –जा करतात त्यांची येण्याची व जाण्याची सोय थांब्यामुळे होणार आहे. जवळा स्टेशनला अधिकृत थांबा दिल्यानंतर मानेगाव, निजामपूर, डोंगरगाव ,सोनंद ,जवळा, बुरंगेवाडी ,भोपसेवाडी, आगलावेवाडी ,तरंगेवाडी ,हून्नूर ,भोसे, घेरडी एवढ्या सर्व मोठ्या गावातील लोकांची दररोज सोय होणार आहे. व रेल्वेचेही पर्यायाने उत्पन्न वाढणार आहे ,दवाखाना आणि दैनंदिन कामासाठी रोज प्रवाशांना जाण्यासाठी हा थांबा गरजेचा आहे आणि हे गाव मोठे असल्यामुळे बाहेरच्या गावांचा संपर्क थेट दळवण्याची सुविधा असल्याने जवळा स्टेशन हे थांबा करिता योग्य आहे आणि तिथं स्टॉप देणे गरजेचे आहे.

जवळा स्टेशन वरून बाकी गावांमध्ये जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था येथून आहे. सांगली वरून येताना या रेल्वेस जत रोड येथून थेट सांगोला थांबा असल्याने दरम्यानच्या गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे

तरी दोन्ही साईड वरून जवळा स्टेशन थांबा तात्काळ मंजूर होणे गरजेचे आहे. महत्वाचे तसेच या गाडीस एकूण 450 किमीच्या अंतरात साधे डबे वापरण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे, एवढ्या लांब पल्ल्याच्या मोठ्या प्रवासात एलएचबी किंवा एक्सप्रेसचे कोच गरजेचे असताना तरीही रेल्वे प्रशासन प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असताना साधे रेक (डबे)कधी बदलणार असा प्रश्न निर्माण होत आहे. अन्यथा रेल्वे प्रशासनाने या गाडीचे तिकीट दर एक्सप्रेसचे न ठेवता पॅसेंजरचे दर ठेवावेत अशी मागणी प्रवाशातून होत आहे या मागणीची दखल न घेतल्यास रेल्वे प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करणार असल्याचे शहीद अशोक कामटे संघटनेने सांगितले.

या निवेदनाच्या प्रती खासदार धैर्यशील मोहिते –पाटील ,खासदार विशाल पाटील , विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुणे,सोलापूर, नांदेड ,अध्यक्ष प्रवासी सेवा संघ, सोलापर,महाव्यवस्थापकसो सिकंदराबाद विभाग सिकंदराबाद यांनाही देण्यात आले आहेत. यावेळी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

सांगली– परळी वैजनाथ एक्सप्रेस रेल्वेस जवळा स्टेशनवर थांबा मिळावा याकरिता या भागातील विविध वाड्या व भोपसेवाडी येथील सुनील गावडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने अशोक कामटे संघटनेकडे मागणी केलेली आहे त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे तसेच या रेल्वेस एलएचबी किंवा एक्सप्रेसचे कोच जोडण्यात यावे अन्यथा तिकीट दर कमी करावेत त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. दोन्ही विषयांच्यामागणी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार केली आहे रेल्वे प्रशासन मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे.

निलकंठ शिंदे सर, अध्यक्ष:– अशोक कामटे संघटना सांगोला

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here