सांगोला नगरपरिषदेचे मुखाधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर हरिभाऊ गवळी यांनी नगरपरिषदेचा अंदाजित अर्थसंकल्प मंजूर करून मा.जिल्हाधिकारी साहेब यांचेकडे मंजूरीसाठी पाठवला आहे.
सन 2024-25 चा सुधारित अंदाज अंदाजपत्रक
आरंभीच्या शिल्लकेसह एकूण जमा रक्कम 222, 59,01,402/-रुपये इतकी जमा असून
एकूण खर्च- 201,16,55,833/- रुपये इतका असून
अखेरची शिल्लक -21,42,45,569/- रुपये इतकी असून
सन 2025-26 चा अर्थसंकल्पीय अंदाज खालील प्रमाणे
आरंभीच्या शिल्लके सह एकूण जमा- 158,95,41,732/- रुपये इतकी असून
एकूण खर्च – 158,92,83,663/- रुपये इतका असून
अखेरची शिल्लक – 2,58,069/- रुपये आहे.
सदर अंदाजपत्रक मध्येखालील बाबींची तरतूद करण्यात आली आहेत -सांगोला नगरपरिषद भुयारी गटार योजनेकरिता तरतूद करण्यात आली असून मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी यांचा सदर योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस आहे.
– सांगोला नगरपरिषद हद्दीतील चौक सुशोभीकरण करणे कामी तरतूद आहे.
तसेच नगरपरिषद हद्दीत डांबरी रस्ते, सिमेंट रस्ते, शहरातील रस्ते सफाई तसेच मुताऱ्या, शौचालय उभारणे व देखभाल, बगीचा देखभाल व नव्याने विकसित करणे, शहरात विद्युत रोषणाई करणे, घनकचरा संकलन, समाज मंदिर बांधणे व त्यांची निगा राखणे, शहरातील मुख्य पुतळ्यांचे सुशोभीकरण करणे व पाणी पुरवठा करणे इत्यादी बाबी करता अर्थसंकल्पा मध्ये भरघोस अशी तरतूद करण्यात आली असून सांगोला नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना विविध पायाभूत सोयी सुविधा पुरवणेवर भर देण्यात आला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत लाभार्थी नोंदणी मेळावा संपन्न
प्रत्येक नागरिकाचे स्वतःचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात 2015 साली करण्यात आली. प्रथम टप्प्यात सांगोले शहरांमध्ये एकूण 280 घरे मंजूर झाली आहेत. मंजूर घरांपैकी 236 घरांची कामे पूर्ण झालेली असून उर्वरित घरेही प्रगतीपथावर आहेत.
शासनामार्फत प्रधानमंत्री आवास योजना २.० घोषणा सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने इच्छुक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता सांगोले नगरपरिषदे मार्फत PMAY UNIFIED WEB PORTAL वर नवीन लाभार्थी नोंदणी मेळावा दि. ०७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्या मध्ये एकूण 68 लाभार्थ्यांची नोंदणी पोर्टलवर करण्यात आली आहे. सदर मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली अमित कोरे CLTC अभियंता यांनी परिश्रम घेतले.
प्रधानमंत्री आवास योजना १.० मधून लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार झालेले आहेत. प्रधानमंत्री आवास योजना २.० च्या अंमलबजावणीस सुरुवात झालेली असून मार्च 2025 पर्यंत लाभार्थी नोंदणी करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे अशा लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना कक्ष येथे संपर्क साधावा.
आरोग्य विभाग
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सांगोला शहरांमध्ये तयारी सुरू करण्यात आली आहे शहरातील रस्ते रोज साफसफाई करण्याचे काम चालू आहे शहरातील विविध ठिकाणी असलेल्या बगीचा मधील साफसफाई चे काम नियमित चालू आहे शहरातील गटरी नाले साफ करण्याची कामे नियमित चालू आहेत तसेच विविध ठिकाणी फवारणी करण्याचे काम दररोज चालू आहे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी विविध स्वच्छतेचे संदेश देणारे पेंटिंग रंगवण्यात आले आहेत स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सांगोला शहरात घरोघरी जाऊन वर्गीकृत कचरा संकलन करून त्याचेवर प्रक्रिया करण्याचे काम कचरा डेपो येथे नियमितपणे चालू आहे सांगोला नगरपालिका मार्फत कचऱ्याचे विविध प्रकारामध्ये विलगीकरण करण्यात येत आहे रोज सकाळी शहरातील सार्वजनिक शौचालय व मुताऱ्या साफ करून घेतले जातात व त्याचे निगा वेळोवेळी राखली जाते. प्लास्टिक बंदी अभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरातीत विविध कामाचे कचरा व्यवस्थापने संदर्भात अभिप्राय घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच जेष्ठ नागरिक, लहान मुले यांना मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असल्याने नगरपरिषदेमार्फत शहरातील मोकाट कुत्र्यांची निर्बीजीकारण मोहीम राबविण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 सांगोला शहरातील कचरा डेपो येथे बांबू वृक्षाची लागवड करण्यात आली.
सांगोला नगरपरिषदेस राज्य अभियान संचालनालय, नागरी यांचे मार्फत नागरी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत एक 50 HP क्षमतेचे ट्रॅक्टर वाहन प्राप्त झालेले आहे.
विद्युत विभाग
1) छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती पूर्व शहरातील सर्व बंद हायमास्ट लाईट्स चालू करून घेतल्या.
2) सांगोला शहरातील एल.ई.डी. पथदिवे दुरुस्तीच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झालेनंतर त्याच दिवसांत निर्गत केल्या आहेत.
3) पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्या समोरील सर्व लाईट्स बदलून सुशोभीकरण केलं.
4) संत रोहिदास जयंती असल्याने खडतरे गल्लीतील समाजमंदिर मधील खराब वायरिंग बदलून उत्तम लाईट व्यवस्था केली.
भुयारी गटार योजना
सांगोला शहराच्या मलनिःसारण टप्पा क्रमांक 1 चे काम प्रगतीपथावर सुरू आहे, सदर योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी HDPE DWC 150 MM व्यासाची पाईप लाईन 56577 मीटर, HDPE DWC 250 MM व्यासाची पाईप लाईन 343.5 मीटर तसेच RCC 450 MM व्यासाची पाईप लाईन 446.5 मीटर टाकण्यात आली आहे. व 2202 Manhole पूर्ण झाले असून 48 Manhole चे काम सुरू आहे. तसेच शहरात विविध ठिकाणी 925 Property Chamber पूर्ण झाले असून 25 Property Chamber चे काम सुरू आहे.
नगर विकास विभाग आयोजित पुणे विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 11 ते 12 फेब्रुवारी 2025 रोजी बारामती येथे पार पडला. यामध्ये सांगोला नगरपरिषदेच्या कर व प्रशासकीय अधिकारी श्रीमती अस्मिता निकम यांनी वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये गोळा फेक (कांस्यपदक) मध्ये यश मिळवले. तसेच सांघिक क्रीडा प्रकारामध्ये रस्सीखेच मध्ये प्रथम क्रमांक मिळाला.
सांगोला नगरपरिषद कार्यालय घरपट्टी, पाणीपट्टीचा भरणा करण्यासाठी दिनांक 22 फेब्रुवारी 2025 पासून 31 मार्च 2025 पर्यंत शनिवार रविवार व सुट्टीचे दिवशी सुद्धा सुरू राहणार
सांगोला नगरपरिषद हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना कळविण्यात येते की दिनांक 22 फेब्रुवारी 2025 पासून 31 मार्च 2025 पर्यंत शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवशी घरपट्टी, पाणीपट्टी, गाळेभाडे, खुलीजागा भाडे भरण्याकरिता नगरपरिषद कार्यालय सुरू राहील, याची सर्व मालमत्ता धारकांनी नोंद घ्यावी. सांगोला नगरपरिषद हद्दीतील घरपट्टी, गाळेभाडे, खुलीजागा भाडे याची प्रभावी वसुली करण्यासाठी श्री. सचिन पाडे, कार्यालय अधीक्षक, श्री. रोहित गाडे व श्रीमती प्रियांका पाटील, कर निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली 6 विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच श्री. महेश राजपूत, श्रीमती अस्मिता निकम, कर व प्रशासकीय अधिकारी व श्री. करण सरोदे, पाणीपुरवठा अभियंता यांचे नेतृत्वाखाली पाणीपट्टी वसुलीची 3 पथके नेमलेली आहेत. ज्येष्ठ नागरिकांना उन्हामध्ये कार्यालयात येवून कर भरणा करणे शक्य होत नसल्यास त्यांनी पथक प्रमुख यांचेशी संपर्क साधल्यास त्यांची घरपट्टी, पाणीपट्टी त्यांच्या घरी येऊन स्वीकारण्यात येईल.
मालमत्ता धारकांनी आपल्या घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकीत व चालू रकमेचा भरणा लवकरात नगरपरिषद कार्यालयात करावा. जे मालमत्ताधारक आपल्या थकीत रकमेचा भरणा 28 फेब्रुवारी पर्यंत करणार नाहीत त्यांचेवर नियमानुसार कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यांचे नळ कनेक्शन कट करण्यात येईल. थकीत गाळा भाडेकरू यांचे गाळे सील करून नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्यात येतील. हे सर्व कटू प्रसंग टाळायचे असतील तर सर्व मालमत्ता धारकांनी आपल्या थकीत व चालू रकमेचा भरणा नगरपरिषद कार्यालयात करावा, असे आवाहन डॉ. सुधीर गवळी, मुख्याधिकारी नगरपरिषद सांगोला यांनी केले आहे.
आस्थापना विभाग
19 फेब्रुवारी 2025 रोजी सांगोला नगरपरिषदमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी सांगोला नगरपरिषद आस्थापनेवरील वर्ग 3 व वर्ग 4 चे एकूण 37 कर्मचारी यांचे परिविक्षाधीन कालावधी समाप्ती आदेश आणि स्थायित्व प्रमाणपत्र संबंधित कर्मचाऱ्यांना सांगोला नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक, डॉ. सुधीर गवळी यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
NULM विभाग
मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बचत गटातील महिलांना उद्योग व्यवसायाची आवड निर्माण व्हावी, प्रोत्साहन मिळावे व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याच्याकरीता शहरातील विविध बचत गटातील सदस्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शहरातील विविध बचत गटातील 50 महिला या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. या अभ्यास दौऱ्यामध्ये सांगली येथील काजू प्रक्रिया उद्योग, पाणीपुरी उद्योग तर इचलकरंजी येथे ब्लू स्टार मशिनरी या गृह उद्योग संबंधी तयार केलेल्या मशिनरीची पाहणी करण्यात आली. यानंतर रत्नागिरी नगरपरिषदेने बचत गटातील महिलांच्या उद्योगास बाजारपेठ उपलब्ध होणेकरीता स्थापन केलेल्या सोनचीरीया शहर उपजीविका केंद्रास भेट देण्यात आली. सदर अभ्यास दौऱ्याचे यशस्वी नियोजन श्री. योगेश गंगाधरे, बिराप्पा हाके, शरद थोरात, श्रीमती जयश्री खडतरे यांनी केले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक