सांगोला तालुक्याचे युवा नेते मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

0

सांगोला (प्रतिनिधी)- ३ ऑक्टोबर रोजी सांगोला तालुक्याचे युवा नेते शेतकरी कामगार पक्षाची तोफ व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या वाढदिवसनिमित्त हार तुरे न स्विकारता सोलापूर जिल्ह्यात विशेषतः सिना नदीच्या काठी आलेल्या पुरामुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू गहू, तांदूळ, ज्वारी इत्यादी साहित्य जमा करण्यात आले. व ते साहित्य प्रशासकीय यंत्रणेमार्फत पूरग्रस्तांना वाटप करण्यात येणार आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून लहान मुलांना खाऊ वाटप करून व सामाजिक भान ठेवून सामाजिक वनिकरण विभाग व डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख प्रेमी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडले. मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त अनेक कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटून पूरग्रस्तांसाठी छोटी छोटी मदत जमा करून सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला. तसेच अनेक कार्यकर्ते यांनी फोन द्वारे, व्हाट्सअप द्वारे मेसेज पाठवून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रभर अनेक कार्यकर्ते यांनी दिवसभर आपापल्या परीने पूरग्रस्तांसाठी  छोटी भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here