थायलंड आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सांगोल्याने मारली बाजी

0

दि.. 23 फेब्रुवारी 2025 रोजी रत्ना बुडीट युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स हॉल येथे थायलंड कराटे कप 2025 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये एकूण 32 भारतीयांचा समावेश होता त्यापैकी सांगोल्यातून तीन व्यक्तींचा समावेश होता या स्पर्धेमध्ये सांगोल्याला चार पदके मिळाली आहेत.यामध्ये दोन सुवर्ण व दोन ब्राँझ पदकांचा समावेश आहे.

सीनियर गटामध्ये जी के वाघमारे सरांनी कता प्रकारात सुवर्णपदक मिळविले.अठरा वर्षाच्या आतील गटामध्ये निजेंद्र चौधरी याने सुवर्णपदक मिळविले व वीस वर्षाच्या आतील गटात आशिष कोकरेला कता व कुमितेमध्ये दोन ब्रांझ पदके मिळाले.

बेस्ट रेफ्रीचा सन्मान निजेंद्र चौधरी व वाघमारे सरांना मिळाला. उत्कृष्ट प्रशिक्षकांचा सन्मान वाघमारे सरांना मिळाला. वाघमारे सर हे गेली सत्तावीस वर्ष सांगोल्यातील मुला मुलींना प्रशिक्षण देत आहेत.वाघमारे सर हे न्यु इंग्लिश स्कूल येथील मागील पटांगणावर दररोज सायंकाळी सहा ते सात या वेळात सांगोल्यातील मुला मुलींना कराटेचे प्रशिक्षण देत आहेत. आणि सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल व विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल येथे मुलांना कराटेचे मार्गदर्शन देत आहेत.

वाघमारे सर व निजेंद्र चौधरी यांनी गेल्या वर्षी थायलंड येथे उत्कृष्ट कामगिरी केली होती. यावर्षी त्यांनी उत्तुंग यश संपादन केले या यशाबद्दल सांगोला येथील कराटे क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यशस्वी स्पर्धकांना भाई राजू मगर माननीय चेतनसिंह केदार-सावंत, राजू ढोले, प्रतापसिंह (आबा ) इंगोले, अनिता इंगवले मॅडम, प्रमोदिनी जाधव मॅडम, डॉक्टर स्मिता गव्हाणे, उत्तम ढोले मालक, डॉक्टर शैलेश डोंबे, साहिल सय्यद, प्रो .जयंत लाडे, किरण चव्हाण, सह्याद्री इंग्लिश मीडियम परिवार, विद्यामंदिर इंग्लिश मीडियम परिवार, शिवाजीनगर मित्रपरिवार, शिवप्रेमी मित्र मंडळ, संदीप चौगुले मित्रपरिवार तसेच राजकीय, सामाजिक क्रीडा क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात आल्या.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here