एकीकडे सरकारी नोकरी मिळत नसल्याची ओरड तरुणांमध्ये नेहमीच ऐकायला मिळत असताना सांगोला तालुक्यातील गळवेवाडी या छोट्याश्या गावातील विशाल बाबुराव गळवे याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एकाचवेळी सरकारी नोकरीच्या तीन परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवलं आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कुठलाही खासगी क्लास न लावता जिद्द व मेहनतीने घरीच अभ्यास करून विशालने मुंबई जिल्हा पोलीस, मुंबई चालक पोलीस, मुंबई कारागृह पोलीस या तीन परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.
लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले व चार वर्षांपूर्वी आजी आजोबांनीही जगाचा निरोप घेतला त्यामुळे लहान भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी विशालवर आली. काम करून कुटुंबाची जबाबदारी पार पाडत घरीच अभ्यास करून त्याने हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक