सांगोला (प्रतिनिधी):- डोंगरगाव ता. सांगोला येथील संस्कृती बाळासो पवार हिने नोव्हेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या देशात अव्वल स्थानी असलेल्या सीए परीक्षेत प्रथम श्रेणीत उज्वल यश संपादन केले आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोंगरगाव व सांगोला शाळा नंबर १ येथे झाले असून माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, पलूस येथे झाले आहे व उच्च माध्यमिक शिक्षण कॉमर्स कॉलेज, सांगली येथे झाले आहे.
तिचे वडील श्री. बाळासो तुकाराम पवार हे महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव च आई सौ. अनिता बाळासो पवार या शेगाव हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक