राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने संतोष महिमकर यांचा मुरूम येथे सन्मान 

0

सांगोला (प्रतिनिधी): समाजसेवेचे व्रत हाती घेऊन विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून सांगोला येथे कार्यरत असलेल्या संतोष मधुकर महिमकर यांना मुरूम ता. उमरगा येथे रविवारी सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मुरूम येथे बसव प्रतिष्ठान अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार देऊन २७ व्यक्तीना सन्मानित करण्यात आले, त्यात सांगोला येथील संतोष मधुकर महिमकर यांचा समावेश होता.

यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात शालेय साहित्याचा वाटप केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. सह संचालक साखर आयुक्तालय पुणे डी. आय. गायकवाड, विठ्ठलसाई कारखाना संचालक विठ्ठलराव बदोले, उद्योजक बालाजी सुरवसे, मुख्याधिकारी सचिन भुजबळ, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, बसप्पा वळसंग, शाहीर रमेश खाडे, बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे आदीसह महिमकर कुटुंबीय उपस्थित होते. याप्रसंगी विठ्ठलराव बदोले, डी. आय. गायकवाड, सुरवसे, भुजबळ आदिनी मनोगत व्यक्त केले.

संतोष महिमकर यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अच्युत फुले, बसवेश्वर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संदेश पलसे, वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here