प्रतिनिधी (समाधान मोरे): ग्रामीण मराठी कवी संतोष रायबान यांना त्यांच्या ‘ओल काळजाची’ या पुस्तकासाठी खेडभाळवणी येथील स्व. कुबेर आबा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानवर्धिनी वाचनालयाच्या वतीने ‘ज्ञानवर्धिनी’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
हा पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल सर्व परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. समाजातील नानाविध घटकांवर आधारित, सत्य घटनेवर आधारित असलेल्या कवितांना पुरस्कारामुळे योग्य न्याय मिळाला असेही बोलले जात आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर होते. यावेळी सागर पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर अँड. अमर पाटील, ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील, ज्ञानवर्धिनी वाचनालयाचे संस्थापक सचिव राजेश पवार सर, आयुर्वेदाचार्य बाबुराव पाळेकर, बळीराजा प्रतिष्ठान शेळवेचे अमोल चव्हाण, अंकुश गाजरे उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक