सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्रामध्ये शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सिझेरियन, नॉर्मल डिलिव्हरी, गर्भाशय पिशवी काढणे, अपेंडिक्स, हर्निया या प्रमुख शस्त्रक्रिया समाविष्ट नाहीत. या प्रमुख शस्त्रक्रिया समाविष्ट कराव्यात. अशी मागणी सांगोला नगर परिषदेचे मा. बांधकाम समितीचे सभापती सतीश भाऊ सावंत यांनी राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिडकर, आयुष्यमान भारत मिशनचे राज्याचे प्रमुख ओम प्रकाश शेटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सिझेरियन, नॉर्मल डिलिव्हरी, गर्भाशय पिशवी काढणे, अपेंडिक्स, हर्निया या प्रमुख शस्त्रक्रिया समाविष्ट नाहीत. या प्रमुख शस्त्रक्रिया समाविष्ट कराव्यात. शासकीय हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर व भूलतज्ञ नसल्यामुळे या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण खाजगी रुग्णालयात जातात. या शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयात गोरगरिबांना हजारो रुपये द्यावे लागतात. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा गोरगरीब रुग्णांना प्राण गमावावे लागतात.
शासकीय हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची कमतरता भूलतज्ञांची कमतरता तसेच इतर गोष्टींची कमतरता असल्यामुळे आशा रुग्णांना खूप मोठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे या शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत समाविष्ट करण्यात याव्यात. यामुळे गरजू व गरीब रुग्णांना फायदा होईल व आर्थिक भार कमी होईल व महाराष्ट्रातील रुग्णांना दिलासा मिळेल असेही निवेदनात नमूद केले आहे हे निवेदन बांधकाम समितीचे माजी सभापती सतीश भाऊ सावंत यांनी राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश अबिटकर , आयुष्यमान भारत मिशनचे राज्याचे प्रमुख राज्यमंत्री दर्जा ना. ओम प्रकाश शेटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांना देण्यात आलेले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक