शिंदे आदर्श विद्यालयात सावित्रीबाई फुले, वामनराव शिंदे साहेब स्मृतिदिन साजरा

0

शालेय शिक्षणात उच्च ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न हाच यशाचा राजमार्ग आहे:–निलकंठ शिंदे सर 

सांगोला (प्रतिनिधी)संस्थापक शिंदे साहेबांनी 34 वर्षापूर्वी केलेल्या कार्याचा सुगंध अद्यापही दरवळत आहे पुढील शतकानूशतके समाजासाठी केलेल्या कार्याचा सुगंधही कृतज्ञच राहील,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व वामनराव शिंदे साहेब यांनी बहुजनांच्या शिक्षण प्रसारार्थ केलेले कार्य प्रेरणादायी, प्रशंसनीय असून शालेय शिक्षणात उच्च ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न हाच यशाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन संस्था सचिव निलकंठ शिंदे सर यांनी केले.

सावित्रीबाई फुले व शिंदे साहेब यांचे समाजकार्य महान असल्याचे गौरवोउदगार याप्रसंगी व्यक्त केले . विद्यार्थ्यांनी कायम या समाजसुधारक महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करावे.शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संस्थापक वामनराव शिंदे साहेब यांच्या 33 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाचे सुरुवातीस सावित्रीबाई फुले व संस्थापक वामनराव शिंदे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम ,प्रमुख पाहुणे रामभाऊ शिंदे ,सहसचिव विठ्ठलपंत शिंदे सर, अर्चना राऊत व ताई महांकाळ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी भालके मॅडम यांनी संस्थापक वामनराव शिंदे साहेब यांचा त्या काळातील दूरदृष्टीकोन आपल्या मनोगतातून सांगितला, साहेबांच्या संस्मरणीय अनेक आठवणींना या मान्यवरांनी उजाळा देऊन आदरांजली अर्पण केली. यावेळी संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष कुंभार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here