सांगोला मध्ये शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न 

0

सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पोर्ट्स कराटे डॉ असोसिएशन सोलापूर यांच्या सहकार्याने सांगोला मध्ये दिनांक 5 व 6 ऑक्टोबर रोजी बंधन पॅलेस सांगोला येथे जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेच्या उद्घाटनाकरिता 5 ऑक्टोबर रोजी रोजी मुलांच्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या हस्ते क्रीडा अधिकारी सत्यान जाधव सर, सोलापूर जिल्ह्याचे कराटेचे अध्यक्ष जी के वाघमारे सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले व 6 ऑक्टोबर मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन सांगोल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेबांच्या हस्ते झाले. या स्पर्धेला जिल्ह्यातील सर्व शाळेचा सहभाग होता.

या स्पर्धा वय आणि वजनी गटाप्रमाणे घेण्यात आल्या या स्पर्धेला राष्ट्रीय पंचांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेला पंच म्हणून जीके वाघमारे सर, विश्वजीत हेंबाडे, निजेंद्र चौधरी, श्रावणी वाघमारे, गणेश जाधव, सुनील वाघमारे, मयंक स्वामी, आशिष कोकरे, राजनंदिनी वाघ यांनी काम पाहिले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here