ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार  

0

सांगोला, ता. २६ : ग्रंथालय चळवळीत गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या सांगोला येथील ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार नुकताच रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ हिरक महोत्सवी अधिवेशनात प्रदान करण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार’ सांगोला येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्राथमिक शिक्षक ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांना नुकताच उपस्थित मान्यवर यांचे हस्ते शाल,मानपञ ,शिल्ड रोख रक्कम 5001 देण्यात आले. गुलाबराव पाटील यांच्या ग्रंथालय चळवळीतील प्रदीर्घ,निष्ठावंत आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात आला आहे. श्री.पाटील यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना समाजप्रबोधन,वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि ज्ञानचळवळीच्या विस्तारासाठी स्वतःला पूर्णतः वाहून घेतले आहे. सांगोला तालुक्यातील मौजे आलेगांव येथील स्वामी विद्यानंद सार्वजनिक वाचनालयाचे ते संस्थापक अध्यक्ष म्हणून सन १९९४ पासून काम पाहत आहे. त्यांनी या ग्रंथालयाच्या उभारणीत आणि सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले आहे.केवळ एका वाचनालयापुरते मर्यादित न राहता, त्यांनी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, पुणे विभाग ग्रंथालय संघ आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ या संघटनांमध्ये अध्यक्ष,उपाध्यक्ष,कार्याध्यक्ष , प्रमुखकार्यवाह कार्यवाह,संचालक व निमंत्रित सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडून ग्रंथालय चळवळीला व्यापक दिशा दिली आहे.

याशिवाय सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे ते संस्थापक अध्यक्ष आणि दीपकआबा सांळुखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.रोटरी क्लब ,अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला ,विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी समाजहिताचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संघ व रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या वार्षिक अधिवेशनात हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमिञ गजानन कोटेवार, ज्येष्ठ साहित्यिक दत्ताजी कुलकर्णी, कोकण विभाग सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमिञ श्रीकृष्ण साबणे, महेंद्र दळवी, प्रकाश कालेकर, ग्रंथमिञ कुंडलिक मोरे, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ज्योतीराम गायकवाड, प्रमुख कार्यवाह साहेबराव शिंदे ग्रंथमिञ विजयकुमार पवार यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

रत्नागिरी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास संजय सरगर , अमर कुलकर्णी, बिरुदेव काळे, मच्छिंद्र लेंडवे, अनिल कुलकर्णी ,औदुंबर काळे, शिवाजी नागणे ,सिध्दार्थ खरात प्रथमेश बनसोडे ,सारिका माडीकर ,वृशाली हजारे ,छाया मोरे ,अमृता कुलकर्णी ,वृशाली काळे ,रमेश कोकरे ,अनंत ढोले सह महाराष्ट् राज्य ग्रंथालय संघ ,कोकण विभाग ग्रंथालय संघ सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ सांगोला तालुका ग्रंथालय संघ पदाधिकारी ,ग्रंथालय कार्यकर्ते सेवक आदी उपस्थित होते. गुलाबराव पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here