प्रभाग ११ मध्ये शिवसेनेचे उमेदवार नितीन इंगोले मैदानात, प्रभागाचा चेहरा बदलण्याचा संकल्प

0

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी आमदार शहाजीबापू यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा रोडमॅप जाहीर

सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेनेचे उमेदवार नितीन इंगोले यांनी प्रभागाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा संकल्प केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पाणीदार नेतृत्व म्हणून ओळख असलेले माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या थेट मार्गदर्शनाखाली नितीन इंगोले यांनी प्रभागासाठी व्यापक विकास आराखडा जाहीर केला आहे.

प्रभाग ११ मध्ये नागरिकांना सर्वाधिक भेडसावणारा मुद्दा म्हणजे कचरा डेपोचा त्रास. दुर्गंधी, डास, अस्वच्छता यामुळे नागरिकांना अक्षरशः त्रासाचा जीवनव्यवहार करावा लागत आहे. शिवसेनेचे उमेदवार नितीन इंगोले यांनी या प्रश्नाला प्राधान्य देत स्पष्ट भूमिका मांडली “कचरा डेपोचे स्थानांतर, आधुनिक कचरा प्रक्रिया यंत्रणा आणि वैज्ञानिक पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन हा प्रश्न आम्ही कायमस्वरूपी मार्गी लावणार!” आहोत असे सांगितले. या विधानानंतर प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून हा मुद्दा निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो, अशी चर्चा रंगली आहे.

प्रभाग ११ मधील शिवसेनेचे उमेदवार नितीन इंगोले यांनी प्रभागात स्वच्छता आणि पायाभूत सुविधा, डांबरीकरण, सिमेंट रस्ते व गटारींचे सुशोभीकरण, स्ट्रीटलाईटचे संपूर्ण जाळे कार्यक्षम बनवणे, कचरा संकलनाची नवी मॉडेल पद्धती, पाणीपुरवठा नियमिततेसाठी ठोस प्रयत्न, जास्तदाबाने पाणी मिळावे यासाठी नवीन पाईपलाईन, पाणीसाठवण टाक्यांचा विस्तार, तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन केंद्र, कौशल्यविकास उपक्रम, कोर्सेस, प्रशिक्षण, लघुउद्योग प्रोत्साहन, महिला व वरिष्ठ नागरिकांसाठी सुविधा, आरोग्य शिबिरे, सामाजिक-सांस्कृतिक गरजांवर लक्ष, उद्याने व क्रीडांगणांचे आधुनिकीकरण, वाचनालय, अभ्यासिका, तरुणांसाठी ओपन जिम, कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक सभागृह आदी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे शिवसेनेचे उमेदवार नितीन इंगोले यांनी सांगितले.

शिवसेनेच्या प्रचारफेरीत नितीन इंगोले यांचा उत्साह आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहण्यासारखा आहे. प्रभागात“विकास हवा, दिशा हवी… म्हणून इंगोले हवे!” या घोषणांनी वातावरण भारावले आहे. प्रभागातील छोट्या-छोट्या अडचणी ते थेट नागरिकांकडून समजून घेत असल्याने त्यांना स्थानिक पातळीवर प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जनतेचा उत्साह, शिवसेनेचे घनदाट जाळे आणि नेतृत्वाचा पाठिंबा पाहता नितीन इंगोले प्रबळ दावेदार ठरत असल्याचे राजकारणात बोलले जात आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here