सांगोल्यात उद्या सोमवार दि.०७ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतीथांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. गेले अनेक वर्षापासून शिवप्रेमींचा असणारे स्वप्न साकारत असताना शिवप्रेमी मंडळाला मनस्वी अतिशय आनंद होत आहे. २७ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशिल्पाचे सांगोला शहरांमध्ये आगमन झालेले असून बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे जल्लोष स्वागत सर्व जाती धर्मातील बांधवांनी फटाके पेडे गुलाल फुलांची मुक्त उधळण करून राजांचे भव्य दिव्य असे स्वागत केलेले होते.
शिवशिल्प शिवतीर्थावर विराजमान झाल्यानंतर उद्या सोमवार दि.७ ऑक्टोंबर रोजी शिवतीर्थांचे लोकार्पण छत्रपती उदयन महाराज (सातारा गादी), छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर गादी),श्रीमंत शिवाजीराजे जाधवराव (सिंदखेड राजा जिजाऊ साहेबांचे माहेरकडील वंशज), श्रीमंत अमोल राजे भोसले (अक्कलकोट संस्थान), श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज), डॉ. राजरत्न आंबेडकर (महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज) यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुक्यातील सर्व राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्याने शिवतीर्थाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
शिवप्रेमी मंडळाला आजपर्यंत सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहकार्य केलेले असून या पुढेही आपणा सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली मंडळाची पुढील वाटचाल राहील. या शिवतीर्थ च्या लोकार्पण सोहळ्यास सर्व शिवप्रेमीनी सहकुटुंब पारंपारिक वेशभूषा मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवप्रेमींकडून करण्यात आले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक