प्रामाणिकपणा दाखवत लॉंड्रीचालक संतोष चन्ने यांनी परत केले ५० हजार रुपये !

0

सांगोला ( प्रतिनिधी )- गिर्‍हाईकाने धुण्यासाठी दिलेल्या कपड्यात चुकून आलेले ५० हजार रुपये सांगोला येथील एका लॉंड्रीचालकाने प्रामाणिकपणा दाखवत परत केले. या प्रामाणिकपणाबद्दल लॉन्ड्रीचालक संतोष चन्ने यांचा संबंधित गिर्‍हाईकाने सत्कार करून आभार व्यक्त केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाकी घेरडी येथील रहिवासी असलेले संतोष चन्ने यांची सांगोला शहरात कचेरी रोडवरील मदने मेडिकल जवळ श्रीनाथ लॉन्ड्री आहे. आपला व्यवसाय करून मंगळवारी रात्री घरी जाताना आलेगाव येथील भारत दिवसे ( आर के टेलर ) यांचे कपडे भट्टीसाठी घेऊन आपल्या गावी गेले होते. कपडे धुण्यासाठी घेतले असता त्यांना दिवसे यांच्या खिशात काहीतरी असल्याचे जाणवले. खिशात पाचशेची दोन बंडले मिळून आले. दोन्ही मिळून ५० हजार रुपयाची रक्कम त्यांना मिळून आली. बुधवारी चन्ने यांनी दिवसे यांना फोन करून ५० हजार रुपये आपल्या कपड्यात मिळाल्याचे सांगितले. सायंकाळी दिवसे यांनी ही रक्कम परत मिळाल्याबद्दल चन्ने यांचा फेटा, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी उमेश वाळके, सुनील लवटे सर, सुरेश लवटे सर डॉ. पुण्यवंत निमग्रे यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.

सध्याच्या युगात प्रामाणिकपणा हा सहजासहजी पाहायला मिळत नाही परंतु, लॉन्ड्री चालकाने कपड्यात आलेले ५० हजार रुपये जसेच्या तसे परत केल्याबद्दल लॉन्ड्री चालक संतोष चन्ने यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here