कॅलेंडरच्या माध्यमातून विठ्ठल मल्टीस्टेटने प्रत्येक कुटुंबाशी नाळ जोडली
सांगोला (प्रतिनिधी) – सांगोला येथील श्री. विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयात कॅलेंडर लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीची पूजन आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव (सर) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या कॅलेंडर प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेच्या कामकाजाविषयी चेअरमन दिपक बंदरे यांनी माहिती दिली. यावेळी अरविंद डोंबे (गुरुजी), राजन चोथे, अनिल घोंगडे, दिलीप मारडे, राजू घोंगडे, प्रदीप मारडे, इरफान खतीब, बापू मार्डे, रमेश लोखंडे, प्रसाद जाधव, संतोष लाटणे, अर्जुन मासाळ (सर), धनाजी चव्हाण, सुधाकर भगत, उत्तम दिघे, प्रवीण भगत, महेश घोंगडे, विष्णू गोडसे इ. सह बँकेचे बहुसंख्य सभासद, ठेवीदार व कर्जदार उपस्थित होते.
आपुलकी प्रतिष्ठानला दै. ‘सकाळ’ चा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव (सर) यांचा सत्कार संस्थेच्या सी.एफ.ओ. सौ. सरस्वती पंडित मॅडम, सौ. स्वप्नाली फुले मॅडम व सर्व महिला अधिकारी यांचे हस्ते करण्यात आला.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक